तासवडे एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट होऊन कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

कराड : केमिकलचे बॅरेल कापत असताना भीषण स्फोट होऊन एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये घडली आहे. यामध्ये एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. . बिकेश कुमार रंजन (वय 25, मूळ रा. बिहार) असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तासवडे एमआयडीसी मध्ये सौरभ श्रीकांत कुलकर्णी यांची डिप्स बायोटिक नावाची जनावरांचे औषध बनवणारी कंपनी आहे. या कंपनीला लागूनच त्यांची दुसरी कंपनी असून त्या ठिकाणी औषधाच्या गोळ्या ठेवण्यासाठी प्लास्टिक बरण्या तयार केल्या जात होत्या. या कंपनीच्या लोखंडी गेटचे काम सातारा येथील राणा यादव या ठेकेदारास दिले होते. त्यांनी गेटच्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी बिकेश कुमार आणि एका मजुरास सांगितले होते. तेथेच डीप्स बायोटेक कंपनीचे बांधकाम सुरू असून पाणी साठवण्यासाठी बॅरेलची आवश्यकता होती. त्यामुळे कंपनीतील कामगाराने केमिकल कंपनीतून पत्र्याचा बॅरेल आणून तो बिकेश कुमारकडे कापण्यासाठी दिला होता. बिकेशकुमार ग्राइंडरने हे बॅरेल कापत होता. मात्र बॅरेलमध्ये शिल्लक असलेल्या केमिकलमुळे गॅस तयार झाला आणि अचानक मोठा आवाज होत बॅरेलचा स्फोट झाला. या स्फोटात बिकेश कुमार बाजूला फेकला गेला. आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या सोबत काम करत असलेल्या कामगाराने बिकेश कुमारला उपचाराकरिता कराड येथे हलवले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस हवलदार योगेश भोसले, डी. आ. काळे, निलेश विभूते आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर ए. बी. खरटमल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • #KARAD
  • आम्हाला जोडण्यासाठी

    संबंधित बातम्या

    सुयोग डेव्हलपर्स
    छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
    सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
    चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
    ठोसेघर धबधबा फेसाळला
    मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त