मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज पुन्हा हॅक
Satara News Team
- Fri 30th May 2025 02:50 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दि. २९ मे २०२५ रोजी रात्री हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.
असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या Chh.ShivendraRaje Bhonsle या फेसबुक पेजवर दररोज ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम, बातम्या आदी प्रसिद्ध केले जाते. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये हे पेज हॅक करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी हे पेज रिकव्हर करून त्याचा एक्सेस मिळवण्यात सातारा पोलिसांच्या सायबर सेलला यश मिळाले होते. त्यानंतर सदर पेजवर ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून अधिकृत पोस्ट व मजकूर प्रसिद्ध केला जात होता. दरम्यान, गुरुवार दि. २९ मे २०२५ रोजी रात्री पुन्हा हे पेज हॅक झाल्याचे निदर्शनास आले आहे. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या जनसपंर्क कार्यालयाकडून याबातची रीतसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली आहे. सदर पेजवर कोणतीही अनधिकृत, आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास त्यास संबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत, आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
हॅकरचा शोध घेत आहेत. पेज हॅक झाल्याने या पेजवर पडणाऱ्या पोस्ट किंवा मजकुराशी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले अथवा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे सदर पेजवर आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स व नागरिकांनी लक्ष देऊ नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 30th May 2025 02:50 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 30th May 2025 02:50 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 30th May 2025 02:50 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 30th May 2025 02:50 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 30th May 2025 02:50 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 30th May 2025 02:50 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 30th May 2025 02:50 pm













