किल्ले वंदनगड येथे श्रावणी महापुजा व पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन

वाई: खोलवडी ता.वाई येथील किल्ले वंदन गडावर श्रावणी सोमवार निम्मित श्री वंदनेश्वर पालखीसोहळा, महाअभिषेक आणि महापूजेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.
    दि.०४/०९/२३ रोजी श्रावणी सोमवार निम्मित किल्ले वंदन गड खोलवडी ता. वाई येथे श्री वंदणेश्वर यांच्या महाअभिषेक पालखीसोहळा आणि महापुजेचे आयोजन,शिववंदणेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.तसेच या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
   शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या संयोजकांनी कार्यक्रमाची दिलेली माहीती अशी की, दि.०३/०९/२३रोजी सकाळी,ठीक १०.०० श्रींची पालखी कोटेश्वर महाराज मंदिर गोवे येथून कृष्णामाई स्नान करून प्रस्थान करेल.मालगाव ता.सातारा येथील शिवमंदिरात आरती करून पालखी खालची राऊतवाडी, खोलवडी,गणेशखिंड मार्गे किल्ले वंदन गडावर मार्गस्थ होईल.वंदन गडावर रविवारी रात्री०९ ते १२ गोंधळ,
१२ ते १ रुद्राभिषेक,
रात्री १ ते ३ महा मृत्युंजय यज्ञ(होम)होईल..सोमवारी.पहाटे ३ ते ७ शुश्राव्य भजन 
सकाळी ७ वा. आरती सकाळी ८ ते १२ दर्शन आणि तीर्थप्रसाद होईल.
    या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी,गडकिल्ला संवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवणारया मावळ्यांनी श्रावणी महापूजा आणि पालखी सोहळ्यास उपस्थित रहावे असेआवाहन संयोजकांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त