माढा लोकसभा मतदारसंघात अभय जगताप यांचा विचार करू - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

दहिवडी : भारतीय जनता पार्टीची गुंडगिरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. पोलीस ठाण्यामध्ये आमदार गोळीबार करतो. बिहारपेक्षा वेगळे वातावरण महाराष्ट्रात नाही. लोकशाहीला घातक असणाऱ्या सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. दरम्यान यावेळी माढा लोकसभा शरद पवार साहेबांच्या विचाराचा मतदार संघ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देते. अभय जगताप हे पक्षाशी एकनिष्ठ असणारा तरुण तडफदार, सामाजिक कार्याची जाण असणारा उच्चशिक्षित कार्यकर्ता आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारासाठी अभय जगताप यांचा विचार करूअसे जाहीर केले.

दहिवडी येथील राष्ट्रवादी विजय निश्चय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, महेश जाधव इत्यादी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला