पाटणच्या युवकानं फेसबुकवर मैत्री झालेल्या सांगलीच्या डॉक्टर महिलेचा अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत केली ३ कोटी मागणी
Satara News Team
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
- बातमी शेयर करा

पाटण : सोशल मीडियातील फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी युवकांसोबत ओळख झाल्यास त्याच्याकडून फसवणूक होण्याच्याही घटना आपण ऐकल्या असतील. अशीच घटना सांगलीच्या एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील पाटण येथील राहणाऱ्या एका युवकास सांगली पोलिसांनी अटक केली आहे.
हर्षवर्धन अंकुश कुंभार (रा. पाटण, जि. सातारा) असे सांगली शहर पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला सांगलीतील डॉक्टर असून २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून संशयित हर्षवर्धन याच्याशी ओळख झाली. फेसबुकवर ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यानंतर मैत्रीच्या नात्यातून त्या दोघांच्यात संवाद होऊ लागला. पुढे काही दिवसानंतर दोघांची चांगली ओळख होती. आणि ओळखीतूनच हर्षवर्धन याने आपली आर्थिक अडचण सांगून पीडित डॉकटर महिलेकडून ५० हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर तिला फिरायला जायचे असल्याचे खोटे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी नेले.
त्या ठिकाणी नेऊन तिथे तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर पीडितेने त्याच्याकडे उसने घेतलेल्या पैशाची मागणी केली. तेव्हा हर्षवर्धन याने ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो तिच्या व्हॉटस ॲपवर टाकला. आणि हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ती काम करत असलेल्या ठिकाणी येऊन त्याने तिला मारहाण केली. धमकी देत तिला गाडीतून निर्जनस्थळी नेत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले.
तिच्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत हर्षवर्धन याच्यावर बलात्कार आणि खंडणीचा तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. गुरुवारी हर्षवर्धनला अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
संबंधित बातम्या
-
घातपात करण्याचा प्रयत्न होता; एसटी काय तुझ्या गोठ्यात आली होती का?
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी लोकसेवक कि अवैध व्यवसाय सेवक?
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
म्हसवड पोलिसांची अवैध दारुविक्री व दारु वाहतूकीवर कारवाई ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा
- Sun 10th Dec 2023 06:53 pm
-
पत्नीचा खून, मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या पतीला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Sun 10th Dec 2023 06:53 pm