16 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शाहूपुरी सेंटरचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

कुडाळ : नुकत्याच ठाणे येथे पार पडलेल्या 16 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सातारा येथील शाहूपुरी सेंटरच्या मुलांनी राष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान यश संपादन केले.
सेंटरची स्नेहा पोळ, प्रियल  शिंदे, शिवतेज नगरकर, स्वराली इथापे या मुलांनी भारतात प्रथम क्रमांक पटकविला. तसेच जानवी साळवी द्वितीयआणि सोहम जगताप, अनिश जगताप, समर्थ मोरे ही मुले चौथ्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाली. ह्या आठ ही मुलांनी थायलंड येथे होणाऱ्या थायलंड प्राईम मिनिस्टर कप मॅथेमॅटिक्स आणि मेंटल अर्थ मॅथेमॅटिक्स या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच तनवी जगताप, ओवी पवार, दिया भालेगरे, समर्थ शेडगे ही मुले पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत. सातारा विभागातून केंद्रस्तरावर आत्मजा चव्हाण, यशराज पवार ,अद्विका सुतार, अक्षता चौरे ,समृद्धी  केमदारणे या मुलांनीही क्रमांक पटकाविला आहे.
याकरिता शाहूपुरी अबॅकस सेंटर चालिका सौ रेखा रणजीत पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. हे यश विद्यार्थी आणि पालक यांच्या अथक प्रयत्नातून मिळाले आहे.
असे सौ रेखा पवार मॅडम यांनी नमूद केले आहे. मागील तीन वर्षापासून शाहूपुरी भागात हे सेंटर यशस्वीरित्या कार्यरत असून ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने क्लास घेतले जातात.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त