चाहूल साताऱ्यातील बदलत्या ऋतूची....

 सातारा :

फुल खिले है गुलशन गुलशन ..

एकीकडे थंडीच्या हंगामातून हलक्या उन्हाची  चाहूल जाणवत असतानाच वसंत पंचमीचा रंगोत्सव आता निसर्ग साजरा करू लागला आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात रयत शिक्षण संस्थेसमोर असलेल्या फुलझाडांच्या नर्सरीमध्ये सध्या विविध रंगाची आकर्षक आणि लक्षवेधनारी विविध प्रकारची फुले विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत .त्यामुळे दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातील मोगल गार्डन नव्हे तर आता नामकरण झालेल्या अमृत उद्यानात सामान्य नागरिकांना जशी हजारो प्रकारची फुले पाहायची संधी उपलब्ध झाली असताना साताऱ्यातही हा निसर्गाचा अविष्कार विना मोबदला  पोवई   नाक्यावर अनुभवायला मिळत आहे, आहे की नाही निसर्गाची किमया ?

सातारा...कुंड्या पशुपक्ष्यांच्या अनोख्या आकारातील..

दरवर्षी फेब्रुवारी मार्च चा महिना हा प्रत्येक घरातील बागेच्या सजावटीसाठी तसेच नवीन रोपांच्या लागवडीसाठी सुकाळ मानला जातो. सध्या सातारा शहरात परप्रांतातून चिनी मातीच्या आकर्षक अशा हत्ती,मोर ,बदक, तुळशी वृंदावनाच्या साच्याच्या अतिशय देखण्या आणि सुरेख कुंड्या विक्रीस आल्या आहेत .अतिशय टिकाऊ असणाऱ्या या कुंड्यांची किंमत मात्र पाचशे रुपये पासून घेईल तशी आहे.


गोड लाल भडक कलिंगडांची आवक..

सातारा शहरात सध्या किरण, शुगर बेबी, शुगर क्वीन जातीच्या काळ्यापाठीच्या म्हणजेच हिरव्या गडद रंगातील कलिंगडांची मोठी आवक झाली असून उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच आता या कलिंगडांना मागणी वाढणार आहे .दर मात्र परवडतील असे नगाला वीस ते चाळीस रुपये इतके आहेत .

 

जयंती रामनामाची महती सांगणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची..

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ..असे घोषवाक्य भक्तगणांकडून ज्या रामनामाची महती सांगणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसाठी म्हटले जाते ,त्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराजांचा जयंती दिन गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात भाविकांनी घरोघरी तसेच विविध मंदिरात साजरा केला. सातारा येथील मंगळवार तळ्या नजीकच्या श्री चैतन्य सदन येथील ब्रह्मचैतन्य संस्थांनच्या अधिकृत नाम साधन केंद्रात यानिमित्त महाराजांच्या प्रतिमेला विशेष पूजा तसेच अभिषेक करून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

आंबा लागला मोहरू..

यावर्षी अवकाळी पाऊस आणि गुलाबी थंडीचा परिणाम येणाऱ्या आंबा उत्पादन हंगामावर चांगला दिसू लागला आहे. मात्र तरीही निसर्गाला कोण अडवणार असे म्हणत सातारा जिल्ह्यातील अनेक आंब्याची झाडे अशी मोहरून गेली आहेत त्याचे हे दृश्य आपल्या कॅमेरा टिपले आहे अतुल देशपांडे सातारा यांनी.

आरळे -वडूथ  येथील राज्य महामार्ग ठरतोय जीवघेणा

सातारहून फलटण कडे जाणाऱ्या रस्त्यावर  आरळे -वडूथ    या जोड गावांमध्ये वडूज नजीकच्या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे या ठिकाणी लावलेल्या संरक्षक जाळ्या निघून गेल्याने रस्त्याच्या बाजूला प्रचंड मोठा खड्डा निर्माण झाला असून या खड्ड्यात दिवसा आणि रात्री वाहने पडण्याची दाट शक्यता असून त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे याकडे तातडीने लक्ष देऊन या मार्गावरील अडथळे तसेच अशा धोकादायक जागा दूर कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला