बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे गट भिडणार

सातारा ; सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे  यांच्यात सध्या सातारा शहरातील विकासकामांवरून वाद रंगला आहे.
                 त्याचे पडसाद सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत उमटणार आहेत. आमदार गटाने कोणत्याही परिस्थितीत खासदार गटाला बाजार समितीत शिरकाव करू न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही राजांचे समर्थक समोरासमोर भिडणार आहेत.

सातारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार टोलेबाजी रंगली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी विरुद्ध शिवेंद्रसिंहराजेंची नगर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत होणार हे निश्चित आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला