सातारा शहरातील ६ विकासकामांसाठी ७ कोटी २० लाख आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; जिल्हा नियोजनमधून मिळवला निधी
Satara News Team
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
- बातमी शेयर करा
सातारा- सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका लावणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शहरातील ६ विकासकामे करण्यासाठी तब्ब्ल ७ कोटी २० लाख ५३ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी उपलब्ध झाला आहे.
पालवी चौक, गोडोली येथील मोरे घरासमोर बॉक्स कल्वर्ट करण्यासाठी ३७ लाख ४६ हजार १८० रुपये, पॅरेंट स्कुल ते पालवी चौक, गोडोली अखेर रस्ता खडीकरण करणे १ कोटी ९९ लाख ८४ हजार १९६ रुपये, पॅरेंट स्कुल ते पालवी चौक, गोडोली येथे बॉक्स कल्वर्ट करण्यासाठी ७० लाख १२ हजार ७५० रुपये, समर्थ मंदिर चौक ते रामाचा गोट ते मनामती चौक येथे रस्ता करण्यासाठी १ कोटी ९४ लाख ५१ हजार २१० रुपये निधी मंजूर झाला आहे.
कातकरी वस्ती येथील ओढ्यास संरक्षक भिंत बांधणेसाठी ९९ लाख ६१ हजार ४०५ रुपये आणि पॅरेंट स्कुल ते पालवी चौक, गोडोलीअखेर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी १८ लाख ९७ हजार ९९९ रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून मंजूर कामे वेळेत पूर्ण करा, कामे दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
संबंधित बातम्या
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 1st Aug 2023 09:04 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Tue 1st Aug 2023 09:04 pm













