शिक्षण व्यवस्था माणसाला अर्धवट बनवत आहे : प्रमोद रांजणे

प्राचीन शिक्षण काय होते ?आणि आता काय ?

  सातारा न्यूज :  होरेस मान हे शाळेच्या संकल्पनेचे शोधक मानले जातात. त्यांचा जन्म 1796 मध्ये झाला आणि नंतर मॅसॅच्युसेट्समध्ये शिक्षण सचिव झाला. समाजात शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यात ते अग्रणी होते.घरोघरी, मंदिरे, पाठशाळा, तोल, चतुःपदी आणि गुरुकुलात देशी शिक्षण दिले जात असे . घरांमध्ये, गावांमध्ये आणि मंदिरांमध्ये असे लोक होते जे लहान मुलांना धार्मिक मार्ग आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करत होते. मंदिरे ही शिक्षणाची केंद्रे होती आणि आपल्या प्राचीन पद्धतीच्या ज्ञानाच्या प्रचारात रस घेतला.
प्राचीन  शिक्षणाची वैशिष्ट्ये !
 समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक सिद्ध करणे : ‘पूर्वीच्या काळी शिक्षणासाठी अस्तित्वात असलेली गुरुपरंपरा ही अतीप्राचीन आणि श्रेष्ठ परंपरा असल्याने शिक्षणाची गुणवत्ता (स्तर) उच्चप्रतीची होती. शिक्षण संस्थांचा उद्देश ‘समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक सिद्ध करणे’, हा होता; म्हणून शिक्षण संपल्यानंतर शिक्षणसंस्था पदवीदान समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक योग्यतेप्रमाणे त्यांचा वर्णव्यवसाय निश्चित करत असत. परंपरागत व्यवसायाचे शिक्षण कुटुंबामध्येच मिळत असे.

 सर्वांगीण व्यवहारिक ज्ञान : पूर्वी शाळांमध्ये धर्मशास्त्र, विधी, ज्योतिषशास्त्र यांसारखे सर्वांगीण व्यवहारिक ज्ञान दिले जात असे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह त्याच्यामध्ये शिक्षणानंतर एक चांगला नागरिक बनण्याची क्षमता विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले जात असे. त्यासाठी विद्यार्थ्याच्या निवासाची सुविधाही शाळेतच असायची.

शिक्षण हे समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करण्याचे माध्यम : शिक्षण हे उदरभरण किंवा अर्थार्जन करण्याचे माध्यम नव्हते. प्रत्येक व्यक्ती स्वतःची पूर्ण क्षमता वापरून समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करत असे; म्हणून कोणत्याही व्यवसायात भ्रष्टाचार, संग्रह करणे किंवा भेसळ इत्यादींचा प्रश्नच उद्भवत नव्हता.’

 शिक्षणाची आर्थिक बाजू सांभाळणारे राजे आणि त्याची योग्य परतफेड करणारे विद्यार्थी : वैदिक काळापासून राजे-महाराजे आणि शीर्ष स्थानावर असलेले महाजन जागरूकतेने अन् क्रियाशीलतेने शिक्षण व्यवस्थेचा व्यय करत असत. एखाद्या शिक्षणसंस्थेला आर्थिक साहाय्य करणे, हे ऋषीऋणातून मुक्त होण्याचे पुण्यकर्म मानले जात होते. त्यामुळे शिक्षण संस्था राजाच्या अर्थसाहाय्याने चालायच्या; मात्र त्या राजाश्रित नव्हत्या.’
आधुनिक काळ
आता चे शिक्षण सकाळी ८ ते ३ शाळा व ४ ते ८ ट्युशन दिली जाती खेल हा कुठे गेला सकाळी व्याम पडती आता ते काही नाही सगळे एक व्यस्त वेळापत्रक केले आहै
आता चे ऍडमिशन पडती agent पासून होते पहिले 
मुलाचे टेस्ट घेतल्या नंतर ऍडमिशन दिले जाते 
मुलांनी ची मानसिकता कधी बघितला जात नाही

प्राचीन शिक्षणाने विद्यार्थ्यांना नम्रता, सत्यता, शिस्त, स्वावलंबन आणि सर्व सृष्टीचा आदर करणे यासारख्या नैतिकता देण्यावर भर दिला . हे शिक्षण मुख्यतः आश्रम, गुरुकुल, मंदिरे, घरांमध्ये दिले जात असे. कधी कधी मंदिरांचे पुजारी विद्यार्थ्यांना शिकवत असत.
प्राचीन काळात, "गुरु" हे परम गुरू हेच परम ईश्वर मानले जात होते . संपूर्ण जबाबदारी अशा गुरूंवर आहे ज्यांनी आपल्या शिष्यांच्या रूपात अशा पात्र आत्म्यांची शारीरिक, बौद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक उन्नती केली.
आताचे गुरू लेसन प्लॅन करून शिकवतात खेल मध्ये लेसन प्लॅन शारीक शिक्षण मध्ये प्लॅन करून अरे काय ,
छडी वाजे चम चम विद्या येई घम घम, आता मुलांना मारायची नाही ,परंतु शिक्षक मुलांना तौचिरिंग केली जाते , मानसिक त्रास दिला जातो , असे हे नको प्रत्येक शाळे मध्ये कौन्सिल शिक्षक हवा ,
कॉविद चा नंतर विद्यार्थी मानसिकता खूप नाजूक झाली आहै त्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना समजून सांगा नाकी त्यांना मनाशी खेळू नका त्यांचा जीवनावर खेळू नका
आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल ‘परीक्षा’  म्हटले जाते. पुस्तका बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होते.  स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते. याच कारणामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच, अन्य शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे हि गोष्ट आज जिकिरीची होऊन बसली आहे. ज्याचे पाठांतर उत्तम तो अत्यंत हुशार असा गैरसमज रूढ झाला आहे.

*  दिवसे दिवस महाविद्द्यालयातुन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे. आज वाढत्या औद्योगिकिकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकडीची गरज आहे.परंतु ती  गरज आज पूर्ण होत नाही. पुस्तकी शिक्षणावर जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्ती विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला ह्वा. दुर्दैवाने या विषयांकडे अजूनही उपेक्षेने पाहिले जाते.

*  शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वकष विकास साधण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. भाकरी मिळवून देणारे सुसंस्कार घडविणारे, स्वदेश, स्वभाषा, स्वदेशबांधवांच्याविषयी नितांत अभिमान निर्माण करणारे शिक्षण ह्वे आहे. व्यक्तीविकासाबरोबरच या व्यक्तीच्याद्वारे समाज विकास होईल. व राष्ट्र सर्व दृष्टीने संपन्न होईल असे शिक्षण मिळणे  जरुरीचे आहे. भारत सरकारने यादृष्टीने टाकलेली पावले स्वागतार्ह आहेत असे म्हटले पाहिजे.

*  आजच्या शिकण पद्धतीतून मनुष्य सुशिक्षित होतो पण तो सुजाण, सुसंस्कृत होतोच असे नाही. वास्तविक शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला ह्वी. दुर्दैवाने तसे फारसे दिसत नाही. उलट अधिकतर  माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थ व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गुहलक्ष्मी मानली जाते. बहुसंख्य सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ एक उपभोग्य वस्तू, माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अश्या प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितात आढळते. गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात. आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिका आहे.
Education system is the most dangerous web that is spreading and strengthening itself in the human society. Education is an instrument which changes man into complete man. But today’s education system making man into half.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला