ल्हासुर्णे येथील ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात आमदार महेश शिंदे यांनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद

पुसेगाव : आमदार महेश शिंदे हे सात्विक व धार्मिक प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी म्हणून  सर्वत्र ओळखले जातात. अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात त्यांची हजेरी ही कायमची ठरलेली असते, ल्हासुर्णे येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मानसिंग जगन्नाथ तथा आण्णा कुंभार यांच्याबरोबर फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. 
कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे यांनी अध्यात्मिकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मंदिरांची कामे, सभामंडप, मंदिर परिसराचे सुशोभिकरण यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, सर्वत्र सात्विक वातावरण असावे, असा त्यांचा कटाक्ष असतो. ल्हासुर्णे गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत त्यांच्याकडे ग्रामपंचायतीची सत्ता देखील सोपविली आहे. 
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुट्टी काळात ते ल्हासुर्णे येथे दाखल झाले. अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात सहभागी होत, राष्ट्रीय कॉंग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मानसिंग जगन्नाथ तथा आण्णा कुंभार यांच्याबरोबर फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. 
यावेळी माजी सरपंच किसनराव सावंत, प्रशांत सकपाळ, विद्यमान सरपंच संतोष चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी सावंत, प्रकाशराव सावंत, विशाल भिलारे, महादेव तावरे, चंद्रकांत सावंत, माजी उपसरपंच सचिन सावंत, तुकाराम सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे यांच्या धार्मिक वृत्तीचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, आमदार महेश शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त