शरद पवारांचा निर्णय सर्वांच्याच जीवाला चटका लावणारा; बाळासाहेब पाटील

कऱ्हाड : जेष्ठ नेते शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे. देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हा दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल. या निर्णयापासून त्यांनी परावृत्त व्हावे यासाठी मागणी करण्यात आली असुन त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीव्दारे त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली जेष्ठ नेते पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रतिक्रीया देताना आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, जेष्ठ नेते पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत होते. त्या कार्यक्रमातील समारोपाच्या भाषणात पवार साहेबांनी पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नेते, कार्यकर्ते आवाक झाले. त्यानंतर सर्वांनीच पक्षीय राजकारणातुन निवृत्ती घेवु नये.

दरम्यानच्या काळात तेथे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र त्यावर काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हा दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल. गेली ५५ ते ६० वर्षे राज्याच्या व देशाच्या राजकारणात साहेब सक्रीय आहेत.सर्वांच्याच जीवाला चटका लावणारा हा निर्णय झालेला आहे. या निर्णयापासुन त्यांना परावृत्त करण्यासाठी मागणी करण्यात आली असुन त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीव्दारे त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला