दहिवडीत 15 हजारांची लाच घेताना अभियंत्यासह ठेकेदारास रंगेहाथ पकडले
Satara News Team
- Tue 14th Jan 2025 09:55 am
- बातमी शेयर करा

दहिवडी : सातारा जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. दरम्यान, जिल्हयातील माण तालुक्यात अशीच एक घटना घडली असून माण तालुक्यातील उकिर्डे येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे केलेल्या बांधकामाचे बिल मंजुरीला पाठविण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना दहिवडी येथील बांधकाम विभागाचा शाखा अभियंता व खासगी ठेकेदाराला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजता दहिवडी येथे करण्यात आली.
दहिवडी बांधकाम विभागाचा शाखा अभियंता भरत संभाजी जाधव (वय ५४, रा. डबरमळा, दहिवडी, ता. माण), खासगी व सरकारी ठेकेदार बुवासाहेब जयराम जगदाळे (६१, रा. बिदाल, ता. माण), अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी उकिर्डे, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे बांधकाम केले होते. हे बिल मंजुरीला पाठविण्यासाठी शाखा अभियंता भरत जाधव याने तक्रारदाराकडे २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे रीतसर लेखी तक्रार केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोमवारी दहिवडी येथे सापळा लावला. त्यावेळी ठेकेदार बुवासाहेब जगदाळे याच्यामार्फत भरत जाधव याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजापुरे, गणेश ताटे यांनी ही कारवाई केली.
satara
crime
corruption
स्थानिक बातम्या
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Tue 14th Jan 2025 09:55 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Tue 14th Jan 2025 09:55 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Tue 14th Jan 2025 09:55 am
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Tue 14th Jan 2025 09:55 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Tue 14th Jan 2025 09:55 am
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 14th Jan 2025 09:55 am
संबंधित बातम्या
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ धक्कादायक प्रकार
- Tue 14th Jan 2025 09:55 am
-
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 14th Jan 2025 09:55 am