दहिवडी पोलीस ठाणे जिल्ह्यात नंबर वन..

पोलीस काका पोलीस दीदी , मुद्देमाल निर्गती ,NBW, ६२ पुरस्कार प्राप्त तर डिसेंबर मध्ये सात पुरस्काराने सन्मानित...

आंधळी:  दि १८ सातारा जिल्ह्यातील नंबर वन कामगिरीबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व सहकारी यांना वर्षभरात तब्बल ६२ पुरस्कार व डिसेंबर महिन्यातील सात पुरस्कार मिळवल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी गणपती जाऊन कामे करणे अपेक्षित आहे आणि ते काम करत असताना पोलीस अधिकारी अंमलदार यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे याकरता प्रत्येक महिन्याला कामाप्रमाणे विविध पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याकडून पोलीस महिला व सुरक्षेच्या अनुषंगाने महिला पथदर्शी प्रकल्प पोलीस काका पोलीस दिदी, उपक्रमातून शाळा,महाविद्यालय, अकॅडमी येथे जाऊन मुला मुलींना गुड टच बॅड टच चे मार्गदर्शन,अतीतटीच्या प्रसंगी डायल 112 ला फोन करणे संरक्षण कार्यशाळा अशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात येते. त्याचबरोबर मुद्देमाल निर्गती करण मध्ये मुद्देमाल न्यायालयात जमा करणे, नॉनव्हेलेबल करून दिलेल्या हजर केलेल्या आरोपींना शिक्षा लागून फिर्यादीला न्याय मिळावा या उद्देशाने दोषी सिद्ध मध्ये साक्ष दरम्यान साक्षीदार पंच यांना मार्गदर्शन करण्यात येते. डिसेंबर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती सर्वोत्कृष्ट एन बी डब्ल्यू वारंट, सर्वोत्कृष्ट दोषसिद्ध, मथदर्शी प्रकल्प, असे चार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वरील कामगिरी करणाऱ्या पोलीस हवालदार व आमंलदार यांना पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते क्राईम मीटिंगमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पो. हवा विलास कुऱ्हाडे, विशाल वाघमारे, महिला पो. हवा. विजयालक्ष्मी दडस, नीलम रासकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध ठिकाणी दहिवडी पोलीस ठाण्याचे अभिनंदन करण्यात आले.



  • #dahiwadi
  • आम्हाला जोडण्यासाठी

    संबंधित बातम्या

    सुयोग डेव्हलपर्स
    छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
    सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
    चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
    ठोसेघर धबधबा फेसाळला
    मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त