साताऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी बनसोडे यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान

 पुसेगाव : सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संभाजी सुदाम बनसोडे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैसाजी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले
पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे श्री. संभाजी सुदाम बनसोडे हे   1990  साली ,पोलीस शिपाई या पदावरून भरती होऊन ते सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर जिल्हा विशेष शाखा येथे कार्यरत आहेत त्यांनी पोलीस मुख्यालय सातारा जिल्हा विशेष शाखा ,पाचगणी पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा, आदी ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे पोलीस दलात काम करताना त्यांनी जिल्हा विशेष शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे आज पर्यंतच्या सेवा कालावधीत वेळोवेळी घेतलेले उल्लेखनीय कामगिरी करताना त्यांनी 380  बक्षिसे मिळवली आहेत या त्यांच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत त्यांना सण 2016 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस पदक प्राप्त झालेले असून आज पर्यंत 34 वर्ष उल्लेखनीय केलेले सेवा बद्दल सण 2022 मध्ये माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक पुरस्कृत केले असून सदर पदक अलंकारण समारंभ श्री .रमेश बैसाजी राज्यपाल  महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते दिनांक 6 जून 2024 रोजी दरबार हॉल राजभवन मुंबई येथे संपन्न झाला त्याबद्दल माननीय श्री. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल दलाल ,पोलीस उपअधीक्षक सबनीस यांनी श्री संभाजी बनसोडे यांचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त