सातारा जावली विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या जागेवर नेमका दावेदार कोण

सातारा : राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जाणाऱ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना काटे की टक्कर देणारा उमेदवार गेल्या दोन टर्म ला शोधून शोधून सापडला नाही जो उमेदवार शिवेंद्रराजांच्या विरोधात लढला त्याला विजयश्री कधीच घेता आली नाही असा इतिहास आहे गतवेळच्या दोन विधानसभेच्या निवडणुकीत दीपक पवारांनी शिवेंद्रराजांच्या विरोधात लढाई केली मात्र ही लढाई त्या तोलामोलाची झालीच नाही यातच पहिल्यांदा भाजप कडून दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून दीपक पवारांनी शिवेंद्र राजेंना लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला आता राष्ट्रवादीचा नवा चेहरा जावळी तालुक्यातील अमित कदमांच्या माध्यमातून अजित पवारांच्या मेळाव्यात समोर आला यातच राष्ट्रवादीच्या दीपक पवारांना अमित कर्माचा प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकला गेला शिवेंद्र राजांच्या विरोधात पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा मीच उमेदवार असा ठेका धरलेला दीपक पवारांना अमित कदमांचा नवा प्रतिस्पर्धी स्व पक्षातूनच निर्माण झाला त्यामुळे दीपक पवारांना शिवेंद्रराजांच्या विरोधात या विधानसभेला टक्कर देण्यासाठी आधी अमित कदम यांना पक्षातूनच टक्कर द्यावी लागेल व त्यानंतर शिवेंद्र राजांची निवडणुकीत दोन हात करावे लागतील त्यामुळे अमित कदम यांनी राष्ट्रवादीतून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला तिकीट मिळवायचे यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादीचा उमेदवार दीपक पवार अमित कदम यासह अन्य कोणी तुल्यबळ ताकतीचा उमेदवार येणार हे मात्र नक्कीच आहे मात्र यापूर्वी जावळी महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार जिजी कदम यांचा वारसा चालवणारे अमित कदम यांनी नव्याने विधानसभेसाठी चांगलीच मोठी आहे या सर्व घडामोडी दीपक पवारांना अमित कदमांचा सेटबॅक मात्र बसणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे शिवेंद्र राजांच्या विरोधात दीपक पवार की अमित कदम याची तुलना जावळी साताऱ्यात होऊ लागली आहे दीपक पवारांचा स्वभाव व असलेला दोन्ही तालुक्यातील जलसंपर्क मागील दोन विधानसभेच्या निवडणुकीत तुटपुंजा पडला आकडता हात असल्याने ज्या पद्धतीने निवडणूक लढवायला पाहिजे होती त्या पद्धतीने दीपक पवारांना दोन्हीही विधानसभा मतदारसंघात शिवेंद्र राजांच्या विरोधात निवडणूक लढता आली नाही याचा धागा दोरा घेत अमित कदम यांनी सातारा जावळी मतदारसंघातील नस ओळखली आहे मोठे आर्थिक गणित घेऊन शिवेंद्र राजेंना जोरदार टक्कर देण्याची तयारी अमित कदम यांनी सुरू केली आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपालिकेच्या व नगरपंचायतीच्या निवडणुकीत अमित कदम राष्ट्रपतीची ताकद घेऊन जोरदार मुसंडी मारणार असल्याची तयारी व त्याची रंगीत तालीम सुरू झाली आहे यातच दीपक पवारांच्या पेक्षा अमित कदमांचा युवा संच सातारा जावळीत मोठा आहे दीपक पवारांचे कार्यकर्त्यांची संख्या बघितली तर बोटावर मोजण्या इतपत आहे मात्र त्यापेक्षा अधिक संख्याबळ अमित कदमांची असल्याने पक्षश्रेष्ठींची मर्जी मिळवण्यात अमित कदम युवा नेते म्हणून यशस्वी होतील मात्र मी फक्त शरद पवारांचा कार्यकर्ता असे ठणकावून अजित पवारांच्या समोर सांगणारी दीपक पवार हे युवा कलेक्शन जुळवण्यासाठी कितपत यशस्वी होतील तो येणारा काळच सांगेल या सर्व राष्ट्रवादीतल्या या दोन्ही नेत्यांची वळवळ व त्याची चळवळ सातारा जावळीचे भाजपचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले पाहत आहेत व यावर बारीक लक्ष ठेवून आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या समोरच्या उमेदवाराला किरकोळ न समजता शिवेंद्र राजेंनी देखील वन-टू-वन प्रत्येक कार्यकर्त्याचा संपर्क गावोगावी संपर्क ठेवायला सुरू केला आहे यातच शिवेंद्र राजेंना राष्ट्रवादीतून टक्कर देण्यासाठी अमित कदम आणि दीपक पवार यांनी कंबर कसली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला