महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी झळकली विशेष टपाल कॅन्सलेशनवर !
Satara News Team
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. मुंबई येथील टपाल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आल्याने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान विकसित झाले. मातीविना शेती हा प्रयोगही येथे राबविण्यात आला. तालुक्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. भारतात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८५ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यात घेतले जाते. या स्ट्रॉबेरीची जागतिकस्तरावर असलेली लोकप्रियता आणि महत्त्व लक्षात घेऊन टपाल विभागाकडून स्ट्रॉबेरीचा विशेष सन्मान करण्यात आला
महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा स्वाद आणि त्याचे व्यावसायिक महत्त्व देश-विदेशात प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली असून, ही स्ट्रॉबेरी टपाल कॅन्सलेशनवर झळकल्याने तिचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळेल.
वंदिता कौल, सचिव - डाक विभाग
मुंबई टपाल कार्यालयात सोमवारी झालेल्या सोहळ्यात स्ट्रॉबेरीचे छायाचित्र असलेल्या विशेष टपाल कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल, महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी आदी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
फलटणचा राजे गट ‘धनुष्यबाण’ हाती घेणार?
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
निवडणुकीतील भरकटलेली जनता, निर्ढावलेले नेते अन् व्यवसायीक राजकारण.
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
संबंधित बातम्या
-
निवडणुकीतील भरकटलेली जनता, निर्ढावलेले नेते अन् व्यवसायीक राजकारण.
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Tue 10th Dec 2024 07:42 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Tue 10th Dec 2024 07:42 pm












