दहिवडी नगरपंचायत प्रशासन जोमात,जनता मात्र कोमात!

कचऱ्यास लागलेल्या आगीच्या धुरामुळे ग्रामस्थ आक्रमक
उन्हामुळे आग लागण्याची शंका! दहिवडी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्याशी आगीबाबत विचारणा केली असता, उन्हाच्या तीव्रतेमुळे आग लागल्याची शंका त्यांनी व्यक्त केली असून घनकचरा व्यवस्थापनाचे शेड पुरेसे नसल्याने ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत नाही.असे ते म्हणाले.

दहिवडी : माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या शेडजवळील कचऱ्यास लागलेल्या आगी मुळे जवळपास बारा तास आगीचा भडका होऊन धुराचे मोठमोठे लोट पहावयास मिळाले.

 दहिवडी नगरपंचायतीच्या वतीने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्याचे नियोजन करण्यात आले असून स्पीकरच्या माध्यमातून त्यासंदर्भात आवाहनही करण्यात येते.त्यामध्ये ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यात आले असून नागरिक घंटागाडीतच कचरा टाकताना दिसून येतात.यामुळे दहिवडीतील घाणीचे साम्राज्य बऱ्यापैकी कमी करण्यात नगरपंचायतीला यश आले असतानाच दुसरीकडे शनिवारी रात्री घनकचरा व्यवस्थापनाच्या शेड जवळील कचऱ्यास आग लागल्याने परिसरातील तसेच दहिवडीतील ग्रामस्थांना धुरामुळे प्रदूषणाचा सामना करावा लागला. 

बऱ्याच लहान मुलांसह वृद्धांना धुरामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. शनिवारी रात्री लागलेली आग व धुराचे मोठमोठे लोट रविवारी दुपारपर्यंत सुरूच होते.तसेच कचऱ्यात टाकलेल्या फटाक्यांचा स्फोट वेळोवेळी आगीमुळे होत होता.

दहिवडीतील ग्रामस्थ शरद जाधव धुराच्या प्रदूषणाचा त्रास सुरू झाल्याने घनकचरा व्यवस्थापनाच्या शेड जवळ आले असता कचऱ्यास आग लागलेली त्यांना समजले. त्यांनी विरोधी पक्ष नेते धनाजी जाधव यांना याबाबतची माहिती दूरध्वनीवरून दिली.घटनेची माहिती मिळताच धनाजी जाधव घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता.आग व धुराचा लोट मोठ्या प्रमाणावर असल्याने जाधव चांगलेच संतापले,त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान प्रत्यक्षदर्शी शरद जाधव म्हणाले की,माझे घर घनकचरा व्यवस्थापन शेडच्या जवळच असून मी पाच वाजताच्या दरम्यान घरी होतो.त्यावेळी धुराचे लोट यायला सुरुवात झाली. त्यामुळे मी घनकचरा व्यवस्थापनाच्या शेड कडे धाव घेतली. त्यावेळी कचऱ्यास आग लागल्याचे समजले.आगीबाबत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कर्मचारी जयसिंग अवघडे निरुत्तर झाले.माझ्या घरी लहान मुले,वयोवृद्ध नागरिक असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न धुरामुळे गंभीर बनला आहे.त्यामुळे ही बाब गंभीर असून प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करावी.

 

आगीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी!

आग लागल्यानंतर धुराचे लोट पाहून माजी नगराध्यक्ष व विरोधी पक्ष नेते धनाजी जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या शेड कडे धाव घेतली त्यांनी पाहणी केली असता.धुरामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.शासन घनकचरा व्यवस्थापनास दर महिन्यास जवळपास दहा लाख रुपये खर्च करत असूनही नगरपंचायत प्रशासन कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो कचरा पेटवून देत असतील तर जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त