उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची सातार्यात एंट्री.... इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यासाठीचा प्रकल्प
Satara News Team
- Tue 13th May 2025 12:19 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हयातील मुलांची पुणे मुंबई वारी थांबणार जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची सातार्यात एंट्री होत आहे. या कंपनीकडून जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यासाठी जागा शोधत आहे. या कंपनीने मध्यम पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात टेस्ला इंडियाचे प्रमुख प्रसंथ मेनन यांनी राजीनामा दिला असून, आता टेस्लाच्या चीनमधील टीमकडे भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हैदराबाद स्थित मेघा इंजिनिअरिंगसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर सातार्यात युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टेस्ला सध्या अत्यल्प प्रसिद्धी असलेला पण जबाबदारीने व्यवहार करणारा भारतीय रिअल इस्टेट भागीदार शोधत आहे. ही प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हैद्राबादस्थित मेघा इंजिनियरिंगसोबत चर्चा फिस्कटण्यामागे भूखंडात मोठा हिस्सा मिळवण्याबाबतची अट आणि इतर अटींवर एकमत न होणे ही प्रमुख कारणे होती. त्यानंतर सातार्याचा पर्याय पुढे आला आहे. सातारा जिल्ह्यात ऑटोमोबाईल्स संबंधित यंत्रणा आहेत. त्यामध्ये कूपर कॉर्पोरेशन इंजिन, जनसेट व ट्रॅक्टर उत्पादन कारखाने समाविष्ट आहेत.
पुण्यापासून 110 कि.मी. अंतरावर असलेल्या सातार्यात टेस्ला कंपनी युनिट उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मोठे भूखंड निश्चित करण्यात आले असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र या प्रकल्पासाठी किती जागा लागेल किंवा लॉजिस्टिक याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. टेस्लाचा सुरूवातीचा फोकस मुंबई, बंगळुरू आणि काही प्रमाणात दिल्ली याठिकाणी असेल. दिल्लीमध्ये एत क्षेत्र फारच प्रगत झाले आहे. टेस्लाच्या गाड्या आगामी 3-4 वर्षांत सामान्य खरेदीदारासाठी परवडणार्या नसतील. त्यामुळे दिल्लीचा प्राधान्यक्रम सध्या नसल्याचे एका अधिकार्याने सांगितले. टेस्ला भारतातील एत मार्केटचा वाढता संभाव्य ग्राहकवर्ग लक्षात घेऊन सावध पावले टाकत आहे. कंपनीने आतापर्यंत दोन डझनांहून अधिक मध्यम पातळीवरील पदांवर भरती सुरू केली आहे. त्यामध्ये स्टोअर, सेवा व ग्राहक व्यवहार व्यवस्थापकांचा समावेश आहे
चाकण हे भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल हब मानले जाते. येथे मर्सिडीज-बेंझ, टाटा मोटर्स, महिंद्रा, व्होक्सवॅगन, बजाज यांसारख्या मोठ्या कंपन्यांची उत्पादन युनिटस् आहेत. राज्य सरकारने यापूर्वी पुण्याजवळील चाकण व चिखली येथील औद्योगिक पट्ट्यात टेस्लाला जागा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, हा प्रस्ताव मागे पडल्याचे समजते. अठरा महिन्यांत ‘टेस्ला’चे कामकाज होणार सुरू टेस्ला कंपनी सुरुवातीला गाड्यांचा साठा आयात करणार आहे
. पूर्ण उत्पादन व्यवस्था उभी राहण्यास सुमारे 18 महिने लागणार आहेत. त्यामध्ये 6 ते 7 महिने परवानग्या व नियामक मंजुरीसाठी लागणार आहेत.
सातार्यात टेस्ला कंपनीने सीकेडी युनिट सुरू केल्यास जिल्ह्याच्या विविध क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक तरूणांसाठी तांत्रिक (कुशल) व अपतांत्रिक (अकुशल) नोकर्यांच्या संधी वाढतील. सहाय्यक सेवांमध्ये लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कॅटरिंग आदींमध्ये रोजगार वाढेल. जागतिक दर्जाची कंपनी येण्यामुळे सातार्याची ओळख औद्योगिक नकाशावर ठळक होईल. इतर ऑटोमोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्याही गुंतवणुकीसाठी सातार्याकडे आकर्षित होतील. औद्योगिक विकासामुळे रस्ते, वीज, पाणी आणि इतर औद्योगिक सुविधा उभारल्या जातील. ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टिक सेवांचा दर्जाही सुधारण्यास मदत होईल. शेतकरी कुटुंबातील तरुणांना शाश्वत नोकरीच्या संधी मिळतील. औद्योगिक क्षेत्रात लागणार्या कौशल्यांसाठी आयटीआय, पॉलिटेक्निक व इतर प्रशिक्षण केंद्रे सुरु होऊ शकतात. कंपनीच्या सीएसआर अंतर्गत स्थानिक शिक्षण व आरोग्य क्षेत्रालाही मदत मिळू शकते.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 13th May 2025 12:19 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 13th May 2025 12:19 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 13th May 2025 12:19 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 13th May 2025 12:19 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 13th May 2025 12:19 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 13th May 2025 12:19 pm
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 13th May 2025 12:19 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 13th May 2025 12:19 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 13th May 2025 12:19 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 13th May 2025 12:19 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 13th May 2025 12:19 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 13th May 2025 12:19 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Tue 13th May 2025 12:19 pm











