मुख्यमंत्रांच्या सातारा जिल्ह्यात टोल नाक्यावर लूट

महामार्गावर चौपदरी काम सुरू होऊन वीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी ही अध्याप सर्व्हिस रोडचे काम पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्यात पाणी साचल्याने गरजू नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग पार करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात सुमारे तिनशे ते चारशे निरपराधी लोकांचा बळी गेले आहेत. याबाबत अध्यापही महामार्ग नजिक च्या पोलीस ठाण्यात साधी एफ. आय. आर. दाखल झाली नाही

सातारा  : सातारा जिल्ह्याने क्रांतिकारक नेते पाहिले आहेत. अन्याय करणाऱ्या विरोधात पत्री सरकार स्थापन करणारे सातारा जिल्हा आज अन्यायग्रस्त बनले आहेत.मुख्यमंत्र्यांच्याच सातारा जिल्ह्यात दिवसाढवळ्या टोल नाक्याच्या माध्यमातून लूट सुरू आहे. 'फास्टट्रक' नावाने लूट होत असूनही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
        याबाबत सातारा जिल्ह्यातील जाणकार मंडळींनी सांगितले की, लोकांना जे हवे ते दिले जात नाही. उलट, लोकांना ज्या गोष्टी नको आहेत. त्या माथी मारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारला ही गमजा वाटू लागली आहे. गेली अनेक वर्षे टोल नाके बंद करून त्याचा हिशोब करावा यासाठी राजकीय पक्षांच्या सोबत कार्यकर्त्यानी ही आंदोलने केली. तरी ही आनेवाडी(जावळी) व तासवडे(कराड) येथील टोल नाके सुरूच आहेत. ते बंद करण्याची मागणी विसरून काही महाभाग हे डॉल्बी सुरू करण्यासाठी आपले वजन वापरू लागले आहे. म्हणजे मीठ-भाकर मिळत नसेल तर शिरा-पुरी खा,, असा सागण्याचा च प्रकार जगाच्या पाठीवर फक्त सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
      महामार्गावर चौपदरी काम सुरू होऊन वीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी ही अध्याप सर्व्हिस रोडचे काम पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्यात पाणी साचल्याने गरजू नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग पार करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात सुमारे तिनशे ते चारशे निरपराधी लोकांचा बळी गेले आहेत. याबाबत अध्यापही महामार्ग नजिक च्या पोलीस ठाण्यात साधी एफ. आय. आर. दाखल झाली नाही.दोषारोपपत्र नाही.याची चाड सुद्धा कोणाला वाटत नाही. एवढे निगरगट्ट काही यंत्रणा काम करीत आहे. अशी चोहीबाजूने टीका होत आहे.
          महामार्गावरून सुविधा उपलब्ध होत असेल तर टोल भरणे क्रमप्राप्त आहे. परंतु, सुविधांचा अभाव असतानाही खंडणी देण्याचाच प्रकार आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर राजरोसपणे सुरू आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व तेथील कार्यकर्ते हे जनतेचे सेवक म्हणून कार्य करतात. त्यामुळे जनरेट्यामुळे कोल्हापूर चे टोल नाके बंद पाडले जातात. साताऱ्यात तर आता फास्टट्रक चा बॅलन्स संपला आहे. असे खोटे सांगून आनेवाडी ता जावळी येथील टोल नाक्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा सि. सि. टी. व्ही. फुटेज ही उपलब्ध आहे. तरी ही कारवाई होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने काहींनी त्यांना पाठींबा दिला आहे. परंतु, टोल नाक्यावरील लुटी बाबत मौन धारण केले जात आहे. ही बाब निषेधार्थ असून सातारा जिल्ह्यातील लोकांवर होणाऱ्या अन्याया बाबत पुणे,मुंबई, सांगली, कोल्हापूरच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी कळकळीची मागणी वाहन चालक व स्थानिक भूमीपत्रांनी केली आहे.तसेच छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या सातरकरांवर ही वेळ का आली?  याचे आत्मचिंतन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी करावे असे ही सूचित केले आहे. महामार्गावर सुविधा उपलब्ध होत नाही. हे ठीक आहे पण, फास्टट्रकच्या नावाने चालली लूट तरी थांबवा.तेवढे तरी करून दाखवा अशी विनंती करण्यात येत 

आनेवाडी येथील महामार्गावर फास्टट्रकच्या नावाने वाहन अडविली जातात तो क्षण,,,

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त