शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा 1,51,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

बुधवार नाक्यावरील कारवाईत एकुण 1,51,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सातारा : पोलीस ठाणे हददीतील अवैध मटका जुगारावर कारवाई बाबतच्या सुचना मा.अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक सेा सातारा, मा.अजित बो-हाडे अपर पोलीस अधीक्षक सेा,सातारा व मा.आँचल दलाल सहा.पोलीस अधीक्षक सातारा विभाग सातारा यांनी पोलीस निरीक्षक श्री.संजय पतंगे यांना दिलेल्या होत्या. 
त्याप्रमाणे आज दि.29/07/2022 रोजी पोलीस निरीक्षक श्री.संजय पतंगे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, सातारा शहरातील बुधवारनाका येथील सर्व्हिसिंग सेंटरचे पाठीमागे अवैध तीनपानी मटका जुगार चालु असलेची खात्रीशीर बातमी मिळाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने छापा कारवाई करणेसाठी पो.नि. श्री पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करणेबाबतच्या सुचना दिल्या. सदर पथकाने माहीती घेवुन बुधवारनाका येथील सर्व्हिंसींग सेंटरचे पाठीमागे अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैध तीनपानी मटका जुगार चालु असल्याचे दिसले त्यावेळी छापा पथकाने छापा टाकुन सदर ठिकाणाहुन 6 इसमांना ताब्यात घेवुन पडताळणी केली. त्यांचेकडुन अवैध जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 1,51,200/- रु.किं.चा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर त्या सर्व 6 इसमांविरुदध शाहुपुरी पोलीस ठाणेस अवैध जुगार खेळत असले बाबत गुन्हा दाखल करणेत आला आहे.

अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध तीनपानी जुगारावर छापा टाकत जुगाराचा 1,51,200/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे व सहा आरोपींविरुदध गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे. 

    सदरची कारवाई मा.अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक सेा सातारा, मा.अजित बो-हाडे अपर पोलीस अधीक्षक सेा,सातारा व पोलीस निरीक्षक श्री.संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हेड.कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो.ना.अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ.सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त