राजपथावर धावली कर्मवीर भाऊराव पाटलांची ‘शेवरले’ !
Satara News Team
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणार पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटलांची ‘शेवरले’ गाडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली.
कर्मवीर जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेेत कर्मवीर समाधीस मान्यवरांनी अभिवादन केले. त्यांनतर कर्मवीर यांच्या तैलचित्र असलेल्या रथाची मिरवणूक प्रभात फेरी काढण्यात आली. सातारा शहरातून काढलेल्या मिरवणूकीत गाडी मुख्य आकर्षण ठरली. कर्मवीरांची शेवरले या गाडीतून कर्मवीरांनी शिक्षणक्रांती घडवण्यासाठी राज्यभर प्रवास केला होता. राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. १९१९ ते १९५९ या काळात संस्थेचे अध्यक्ष असताना शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. १९४५ मध्ये त्यांना फलटणचे श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर आणि तात्यासाहेब तडसरकरांनी फोर्ड व्ही-८ गाडी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. त्यानंतर कापीलमधल्या विद्यार्थी काँग्रेस मेळाव्यात कर्मवीरांना सातारा जिल्हा काँग्रेसकडून एक लाख अकरा हजारांची देणगी जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आली. गाडीचा खर्च संस्थेवर पडणार नाही, याची हमी विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर कर्मवीरांनी ही गाडी स्वीकारली. त्यातनंतर बीवायएफ ५३०१ या क्रमांकाची ही शेवरले गाडी ९ हजार १९५ रूपयांना खरेदी केली होती.
या मिरवणुकीच्या निमित्ताने कर्मवीरांची गाडी पाहण्याची संधी मिळाल्यानं कृतार्थ झाल्याची भावना सातारकर आणि रयत सेवक व्यक्त करतात. ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोचवण्याची कर्मवीर भाऊराव पाटलांची तळमळ होती आणि त्यांच्या या कार्याला गती देण्याचं महत्वपूर्ण काम या गाडीने केले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 22nd Sep 2023 01:32 pm











