घोळवेच्या संपर्कातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी केली तर मोठे रॉकेट उघड होईल

सातारा : साताऱ्यातील समाज कल्याण अधिकारी सौ सपना घोळवे यांना एक लाखाची लाच घेताना काही दिवसापूर्वी लाच लुचपत विभागाने अटक केली खरं पण समाज कल्याण ऑफिस मध्ये घोळवे यांच्या ऑफिस मधे आवती भोवती घोळाचे एक रॉकेट  तयार झाल्याची माहिती संबंधित एका अधिका-याने नाव न घेण्याच्या शर्तीवर  सांगितलं आहे. समाज कल्याण अधिकारी  सपना घोळवे यांच्या हाताखाली बरेच कर्मचारी कामाला आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये तुम भी खाओ और हमे भी खाने दो अशी चाल घोळवे यांनी सुरू केली होती. त्यामुळे या सपना घोळवे चा घोळ काढायचा असेल तर समाज कल्याण ऑफिस मध्ये तयार झालेला सर्व घोळीची चौकशी केली तर मोठे रॉकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या ऑफिसमधील घोळवे यांच्या संपर्कातील सर्व अधिकारी वर्गांची चौकशी करावी सपना घोळवेंचा घोळ लपवण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ३  टक्के ५  टक्के अशी रक्कम दिली जात होती अशी चर्चा दबक्या आवाजात समाज कल्याण ऑफिस मध्ये सुरू आहे. सपना घोळवे यांच्या संपर्कातील सर्व अधिकारी सध्या तेथे कामानिमित्त येणा-या नागरिकांशी उध्दट बोलत आहेत कारण त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे ते सध्या चिडचिड करत असल्याची चर्चा सुद्धा संपूर्ण समाज कल्याण ऑफिस मध्ये सुरू आहे त्यामुळे समाज कल्याण मधील घोळ मिटवायचा असेल तर घोळवे मॅडमच्या संपर्कातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी सामान्यातून होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त