अफजल खान कबरी भोवतीचे अतिक्रमण हटविल्याबद्दल एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन -सादिकभाई शेख

सातारा ; 10 नोव्हेंबर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने इतिहासामध्ये अजरामर केलेला दिवस आहे स्वराज्यावरचे आलेले सर्वात मोठे संकट हे अफजलखानाचा हल्ला होता शारीरिक शक्तीने व सैन्य बलाने प्रचंड मोठी ताकद घेऊन आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम संपूर्ण जगाच्या समोर ठेवत हा इतिहास अजरामर केलेला आहे आणि आज त्याच दिवशी सर्व शिवप्रेमींच्या भावनांची कदर करत आणि साताऱ्यातील मुस्लिम मावळ्यांनी दिलेल्या दहा सप्टेंबर रोजी च्या निवेदनाची दखल घेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस  साहेबांनी अफजलखानाच्या कबरीच्या भोवतीचे केलेले अतिक्रमण हटवून शिवरायांच्या मुस्लिम मावळ्याचे आर्त हाक एकल्याने आज शिवप्रेमींच्या मध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे असे प्रतिपादन सादिकभाई शेख व छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे मुज्जफर सय्यद अरबाज शेख व इतर मुस्लिम बांधवांनी केले आहे.
प्रत्येकाला आपले वाटणारे राज्य म्हणजेच स्वराज्य हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन निर्माण केले. स्वराज्य निर्माण करत असताना अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली व स्वराज्यावर आलेले अनेक संकट उलटून लावली त्या संकटापैकी सर्वात मोठे संकट म्हणजे अफजलखानाचा स्वराज्यावरील हल्ला होय आदिलशहाच्या सरदार असणाऱ्या अफजलखानाने आदिलशहाच्या दरबारात बडी बेगम साहेबाला चढ्या घोड्यांनीशी शिवाजीला घेऊन येतो अशी सुपारी घेऊन स्वराज्यावर हल्ला केला परंतु महाप्रतापी महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अठरापगड जातीतील मावळ्यांना बरोबर घेऊन त्या बलाढ्य अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून आपल्या युद्ध कौशल्याची चुणूक संपूर्ण जगाला दाखवून दिली आणि हाच आपला प्रताप सर्व जगासमोर ठेवला आजच्या दिवशी म्हणजे दहा नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून शत्रूला देखील मानाचे स्थान देत त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली .अफजलखान याची कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे ज्यावेळेस अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी या स्वराज्यद्रोह्याचं मुंडक देखील छाठलं होतं हा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे परंतु गेल्या काही वर्षापासून स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या भोवतीचे उदातीकरण झालं होतं व अफजलखानाला पीर अवलिया असल्याचे स्थान काही समाजकंटकांनी दिलं होतं त्या उदातीकरणाच्या विरोधात काही संघटना लढत होत्या परंतु काही जणांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी अफजलखान कबरीच्या भोवतीच्या अतिक्रमणाचा वापर केला सातारा जिल्ह्यातील कोणताही मुस्लिम व्यक्ती अफजलखानाच्या कबरीच्या उदातीकरण्याच्या समर्थनार्थ नाही परंतु राजकारण करणाऱ्याच्या राजकारणाचा बळी हा सातारा जिल्ह्यातील गरीब हिंदू व मुस्लिमच जातो असे वाई येथील दंगलीच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आले आहे. असे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावर प्रेम करणारे सातारा जिल्ह्यातील मुस्लिम मावळे एकवटून  सादिकभाई शेख ,जुबेर इनामदार अरबाज शेख रफिक शेख ,मुज्जफर सय्यद  यांच्या माध्यमातून  अफजलखानाच्या कबरीचा भोवतीचा उदातीकरण काढावे अशी मागणी केली होती . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 नोव्हेंबर या शिवप्रताप दिनीच अफजलखानाच्या कबरीच्या भोवतीचे अतिक्रमण हटविले या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबद्दल सातारा जिल्ह्यातील मुस्लिम मावळे मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन करत असून सातारा जिल्ह्यातील मुस्लिम मावळ्यांच्या माध्यमातून शिवतीर्थ म्हणजेच पवई नाका या ठिकाणी छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मिठाई वाटून अफजलखान कबरीच्या उदातीकरनाचा झालेला वध व मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे कौतुक केले व आनंद साजरा केला 
याप्रसंगी सादिकभाई शेख , जुबेर इनामदार ,अरबाज शेख ,सईद इनामदार ,अझीम चौधरी ,मुज्जफर सय्यद , रफिक शेख, सचिन पवार ,अश्फाक मुजावर व इतर उपस्थित होते .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त