रेवडी विकास सेवा सोसायटीत आ. महेशदादा शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व

खंडोबा ग्राम विकास पॅनलचा १३ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

सातारा : रेवडी ता. कोरेगाव येथिल विकास सेवा सोसायटीवर आ. महेशदादा शिंदे यांच्या विचारांच्या श्री खंडोबा ग्रामविकास पॅनलने सन २०२३ ते २०२८ च्या पंचवार्षिक निवडणूकीत १३ पैकी १२ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. दि १८ रोजी निवडणूक पार पडली. त्यामध्ये तिरंगी लढत होऊन यामध्ये आ. महेश शिंदे साहेबांच्या विचारांच्या पॅनलने मा. आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा बँकेचे चेअरमन नितिन काका पाटील यांच्या विचारांचे मल्हारी म्हाळसाकांत पॅनलचे नेतृत्व धनसिंग शिंदे यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले तर काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे सुनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. त्यांना एकही जागेवर विजयी संपादित करता आला नाही. खंडोबा ग्रामविकास पॅनेलचे सर्वसाधारण गटातून आठही उमेदवार विजयी झाले. यामध्ये सर्वाधीक मतांनी कैलास विष्णु आवारे विजयी झाले. तात्याबा खाशाबा आवारे, प्रदिप शंकर मोरे, सदाशिव रामचंद्र मोरे, रामचंद्र एकनाथ मोरे, मारुती कृष्णा कदम, मोहन भिकु दरेकर, कांतीलाल लक्ष्मण सपकाळ हे बहुमतांनी विजयी झाले. महिला राखीव  मधून सौ मंगल शिवाजी मोरे, सौ. शारदा विष्णू मोरे या विजयी झाल्या. इतर मागास प्रवर्गातून पांडुरंग महादेव नेवासे (सर) तर अनु. जाती जमाती मधून श्री कांता शंकर कुचेकर, तसेच भटक्या विमुक्त जातीमधून शिवाजी जिजाबा माने हे विजयी झाले. पराभूत उमेदवार हे विजयी उमेदवारांच्या मताचा निम्मा आकडादेखील पार करू शकले नाहीत.
वरील निवडणूक श्री खंडोचा ग्रामविकास पॅनेलचे जेष्ठ मार्गदर्शक सुभेदार मोरे, जयवंत मोरे, अरुण मोरे (नाना), विष्णु मोरे, परशुराम मोरे, सतिश मोरे, शिवाजी मोरे, यशवंत नेवासे, यशवंत गायकवाड, भारत कुचेकर, महेंद्र मोरे, निलेश सूर्यकांत मोरे, लक्ष्मण दरेकर, नाना माने, चंद्रकांत मोरे, अशोक आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मा. सरपंच कृष्णात पवार, विद्यमान सरपंच नंदराज मोरे, सुरज मोरे, नितिन मोरे (फौजी), सौरभ नेवासे, सुनिल मोरे, अमर कदम, सुनिल कुचेकर तसेच सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
 विजयी उमेदवारांचे आ. महेशदादा शिंदे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुलदादा बर्गे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनिल खत्री, भाजपा ता.अध्यक्ष संतोषभाऊ जाधव, माजी जि.म. सदस्य राहुलबापू कदम, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला