नागठाणे पंचायतीने कर भरणे करिता लढवली अनोखी शक्कल.

देशमुखनगर-नागठाणे,येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना ग्राम पंचायत कर (घरफाळा) भरणे करिता घंटागाडी द्वारे अनेक वेळा आवाहन करून तसेच घर भरणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून थकीत सवलती असे बरेच मार्ग वापरून कर जमा होत नाही असे निदर्शनास आल्यानंतर  कर भरणाऱ्या खातेदारांसाठी एक अनोखी बक्षीस योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच डाॅ. रूपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली. त्यानुसार आपला थकित कर 31 डिसेंबरपूर्वी भरणाऱ्या खातेदारास एक कूपन देण्यात येणार आहे. त्यात फ्रीज, आटाचक्की, टीव्ही, शिलाई मशीन, सायकल, पैठणी, मिक्सर, पंखे, इस्त्री यासारखी बक्षिसे दिली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. के. मुल्ला यांनी कळविले आहे. ज्यांनी या अगोदर आपला कर भरलेला असेल त्यांना सुद्धा या बक्षीस योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रामाणिकपणे आणिि वेळेच्या अगोद कर भरून ग्रामपंचायत सहकार्य करणाऱ्या लोकांप्रती एक प्रोत्साहन म्हणून ही अनोखी योजना राबविण्याचा मानस आम्ही घेतला आहे पुढच्या वर्षी हीच योजना पहिल्या तिमाईसाठी आम्ही राबविणार आहोतरसोडतीचा निकाल एक जानेवारीला लागणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त