दुचाकी चोरीप्रकरणी एकास पाठलाग करुन पकडले

बोरगाव डीबीची कारवाई : चोरट्यास एक दिवसांची कोठडी

नागठाणे,  : नागठाणे गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दुचाकीवरील एका संशयितास हटकले असता त्याने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोरगाव पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले असता दुचाकी चोर निघाला. याप्रकरणी राहुल उर्फ गोप्या मास्तर पवार (वय 19, रा. नागठाणे, ता. सातारा) याला अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथक नागठाणे परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी नागठाणे ते सासपडे रस्त्यावर राहुल पवार हा मोटार सायकलवर फिरत असताना दिसला. त्याला पथकातील अंमलदारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो मोटार सायकल दामटून पळून जावू लागला. पथकाने त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.

च्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटार सायकल त्याने मारुतीच्या मंदिराजवळून चोरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून संशयिताने आणखीन एक बजाज कंपनीच्या मोटार सायकल क्रमांक (एम. एच. 11   0402) ची चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस नाईक दादा स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण, केतन जाधव, प्रकाश वाघ यांनी सहभाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त