कवडेवाडीतील चोरीचा गुन्हा 24 तासात उघड ; एकास अटक

सातारा: साताऱ्यातील एक महिला कवडेवाडी, ता. कोरेगाव येथे सासूच्या अंत्यविधीसाठी गेल्या असताना त्यांनी रिक्षात काढून ठेवलेले 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेणाऱ्याचा वाठारस्टेशन पोलिसांनी 24 तासात पदार्फाश केला. याप्रकरणी सुहास धनाजी फडतरे (वय 29, रा. देगाव, ता. सातारा, सध्या रा. कवडेवाडी, ता. कोरेगाव) याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहे. वाठारस्टेशन पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 9 रोजी या घटनेतील फिर्यादी सौ. मनिषा उदय जगदाळे (सध्या रा. सातारा) या कवडेवाडी येथे त्यांच्या सासूंचा मृत्यू झाल्याने अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी गळ्यातील सात तोळ्याचे दागिने पर्समध्ये ठेवून ती पर्स त्यांच्या मालकीच्या रिक्षात ठेवली होती. अंत्यविधीनंतर परत आल्याने दागिने असलेले पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. मग त्यांनी वाठारस्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चोरीचा तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. वाठार स्टेशन पोलीस प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार उदय जाधव, अंमलदार प्रशांत गोरे, गणेश इथापे यांच्या पथकाने चोरीचा तपास सुरु केला. यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यातील संशयित सुहास फडतरे याला ताब्यात घेतले. त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कुबली दिली असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातील चोरीचे 3 लाख 60 रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उदय जाधव हे करीत आहेत. दरम्यान 24 तासात चोरीचा गुन्हा उघड केल्याबद्दल तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त