धनंजय मुंडे रात्री साडेबारा वाजता सागर बंगल्यावर
देवेंद्र फडणवीस यांची भेटSatara News Team
- Fri 1st Jul 2022 08:52 am
- बातमी शेयर करा
दरम्यान धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
सातारा न्यूज मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास सागर या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं कारण आणि भेटीमधील तपशील अद्याप कळू शकलेला नाही. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात.
दरम्यान धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
महाराष्ट्रातील राजकारणात 30 जून हा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करणं हा त्यामधील सर्वात मोठा ट्विस्ट ठरला. पण या धक्कातंत्राची मालिका रात्र उलटल्यानंतरही संपली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेणं याची चर्चा सुरु झाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का, या भेटीत उद्याच्या राजकारणाची काही बिजे रोवली गेली आहेत का हे येणाऱ्या काळात कळेल.
dhananjay
munde
sagarbagla
devendarfadnvis
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 1st Jul 2022 08:52 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 1st Jul 2022 08:52 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 1st Jul 2022 08:52 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 1st Jul 2022 08:52 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 1st Jul 2022 08:52 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 1st Jul 2022 08:52 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 1st Jul 2022 08:52 am













