कळंभे ता वाई जि.प. प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाई: वाई तालुक्यातील कळंभे येथील जिल्हा परिषद प्राथमिक यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रकांनी साजरा करण्यात आला.प्रथम २६. जानेवारी प्रसासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई तालुक्याचे सुपुत्र कारगील शहिद शशिकांत आबा सो शिवथरे यांना जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मानवंदना देऊन पुष्यचक्र अर्पण करण्यात आलेनतंर जिल्हा परिषद शाळेतील  इयत्ता ७ वीतील  सर्व विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत . ध्वजगीत. ध्वज प्रतिज्ञा .समूहगीते विद्यार्थीनी आतिशय सुमधूर स्वरात सादर केले
यानंतर प्रजासत्ताक दिनावर आधारित काही नेत्यांची व प्रजासत्ताक दिन या विषयावर विद्यार्थी यांनी भाषणे केली.व देशभक्तीपर गीते गायन ही केली तसेच शालेय स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थी यांचा शाळेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी ग्रामपंचायत कळंभे यांनी प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई तसेच विकास घर शिक्षीका यांचा सरस्वती फोटो श्रीफळ शाल देऊन यशोचित सत्कार केला यावेळी गावातील दानशुर व्यक्तीनी शाळेतील मुलांना खाऊचे वाटप केले तर काही नी शैक्षणिक साहीत्य भेट दिलेकार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य कळंभे विकास सेवा सोसायटी . दूध डेअरी मानाई पतसंस्थेचे चेअरमन व सदस्य गावातील शिक्षण प्रेमी पालक व ग्रामस्थ माजी विद्यार्थी विविध मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला