स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव: मुख्याध्यापक सभा संपन्न..
Satara News Team
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वरच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संजीवन विद्यालय, पाचगणी येथे संपन्न झाली. सदर जाणीव जागृतीच्या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी मा. गटविकास अधिकारी श्री. अरुण मरभळ, मा.गटशिक्षणाधिकारी श्री. आनंद पळसे उपस्थित होते. मा.मरभळ यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वराज्य महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा आदी उपक्रमाअंतर्गत शालेय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात वैविध्यपूर्णरीतीने करावे. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या सेवा कालखंडात मिळालेली एक सुवर्णसंधी असून या महोत्सवास आपले योगदान द्यावे, त्याचबरोबर जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर, विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती, शालेय परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, परसबाग तयार करणे इत्यादी विषयी संदेश दिले. या कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक शाळेस शेवगा,कढीपत्ता, कोकम, फणस,झाडबिया इत्यादी चे प्रातिनिधिक स्वरूपात मा. गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

मा. गटशिक्षणाधिकारी श्री.आनंद पळसे यांनी आपल्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा उपक्रम दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या सर्व शालेय उपक्रमांची सखोल माहिती, ध्वज संहिता पालन विविध स्पर्धांचे आयोजन, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे विषयी व इतर प्रशासकीय विषय उद्बोधन केले. हर घर तिरंगा विषयी शासन निर्णय व निर्गमित सूचना संदर्भात प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीम. श्रीनिधी जोशी यांनी केले. वृक्षारोपण संदर्भात श्री. कुलदीप अहिवळे, शालेय पोषण व ऑडिट याबाबत श्री. सचिन जायकर यांनी मार्गदर्शन केले. श्री. प्रकाश भिलारे यांनी आभार मानले. या सहसभेस केंद्रप्रमुख श्री. दीपक चिकणे, श्री. दिलीप जाधव व श्री. प्रकाश भिलारे तसेच तालुका शिक्षक संघटना अध्यक्ष श्री. सुरेंद्र भिलारे व श्री. भाऊसाहेब दानवले, माध्यमिक मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष श्री. प्रकाश बेलोशे व संजीवन विद्यालय प्राथमिक विभाग प्राचार्य आकांक्षा बोंगाळे व सर्व माध्यमांच्या शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या सहसभेच्या यशस्वीतेसाठी श्री. भास्कर कोळी, श्री. सचिन चव्हाण, श्रीम. पुनम घुगे यांनी परिश्रम घेतले.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
संबंधित बातम्या
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Tue 9th Aug 2022 12:02 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Tue 9th Aug 2022 12:02 pm












