काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल
Satara News Team
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेससोबत महाविकास आघाडीलाही धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
"अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले," अशा शब्दांत संजय राऊत यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा संदर्भ देत अशोक चव्हाणही काँग्रेसवर दावा सांगणार का, अशा खोचक सवाल विचारला आहे. "एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते," असं संजय राऊत यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांनी राजीनामा देताना काय म्हटलं आहे?
गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस पक्ष एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांना पत्र लिहीत अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, "मी दिनांक १२-०२-२०१४ मध्यान्हपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे."
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.काजलताई नांगरे पाटील मैदानात
- Mon 12th Feb 2024 04:05 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Mon 12th Feb 2024 04:05 pm











