बसप्पापेठ शिंदे मळा येथील धुरा फवारणीचा फक्त दिखाव्या पुर्तीच ?

सातारा  : गेल्या काही दिवसापासून सातारा शहरांमध्ये विविध  साथीचे रोग पसरले आहेत. मात्र नगरपालिका प्रशासन हे निद्रा अवस्थेत आसलेल पाहिला मिळत आहे बसप्पापेठ राधिका रोड तसेच शिंदे मळा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध साथीच्या रोगांचे पेशंट आढळुन आले आहेत मात्र नगरपालिका कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. कुठल्याही प्रकारची फवारणी किंवा पावडरची या ठिकाणी फवारणी झालेली नाही नगरपालिकेचे कर्मचारी फक्त मेन मेन रस्त्यावरचा कचरा काढतात दिखावा करण्यापुर्ती पावडर टाकतात पुढे जातात परंतु पोट रस्त्यावरची घाण जशीच्या तशी पाहायला मिळत आहे कोणत्याही प्रकारचा पावडरचे फवारणी या ठिकाणी होत नाही.

 

देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे आज या ठिकाणी धुराची फवारणी करण्यासाठी गाडी आली परंतु....... नाहीं पण पोट गेलं या म्हणीप्रमाणे फक्त आणि फक्त दाखवण्यापूर्ती या परिसरामध्ये फवारणी झालेली आहे बऱ्याच कॉलनी मध्ये ही धुराची फवारणी झालीच नाही या गाडीवरील कर्मचारी उद्धटपणे येथील नागरिकांना बोलून गाडी घेऊन गेले येथील स्थानिक नागरिक महिलांनी या धुर फवारणी गाडीचा आवाज ऐकून बाहेर आल्या मेन रस्त्यावरून फवारणी करून ही गाडी पुन्हा निघाली तेव्हा आमच्या कॉलनी फवारणी करा असं सांगितल्यानंतर सुद्धा या गाडीवरच्या कर्मचाऱ्यांनी  फवारणी न करता फक्त मेन रस्त्यावरच फवारणी करून आपली मोहीम फत्ते केली मग ही फवारणी फक्त नावापुरतीच होती का असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. आणी नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराचा येथील नागरिकांनी निषेध केला आहे फवारणी करायचीच होती तर ज्या कॉलनी तुम्ही जाता त्या सर्व कॉलनीत फवारणी करणे गरजेचे होत मेन रस्त्यावरती फवारणी करून तुम्ही ही देखाव्यासाठी फवारणी केली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला