आ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साधेपणाने साजरा करणार

खा. बापट यांच्या निधनामुळे वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द; गुरुवारी फक्त शुभेच्छा स्विकारणार

सातारा:  सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस गुरुवार दि. ३० रोजी असून भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री, खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाल्याने बुधवार दि. २९ व दि. ३० रोजीचे वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले आहे. वाढदिवस एकदम साधेपणाने साजरा केला जाणार असून गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजता शुभेच्छा स्विकारण्याचा कार्यक्रम होणार आहे. कोणीही पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू देऊ नये, केक कापणे, फटाके वाजवू नये अथवा इतर अन्य कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे. तसेच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिवंगत बापट साहेब यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  


दि. ३० मार्च रोजी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्त गेल्या दोन- तीन दिवसांपासून सातारा- जावली मतदारसंघात विविध कार्यक्रम चालू होते. दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच आले. हे वृत्त समजताच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करीत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. गुरुवार दि. ३० रोजी वाढदिवसानिमित्त एहसास मतिमंद मुलांची शाळा, रिमांड होम येथे भेट दिली जाणार आहे. तसेच गोडोली येथे रक्तदान शिबीर होणार आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे कला वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यावेळीही कोणीही पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नये, केक कापू नये, फटाके वाजवू नये, केवळ शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेला केले आहे. वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला जाणार असून जनता, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी केवळ शुभेच्छा द्याव्यात, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त