नागरिकांचे गहाळ व चोरी झालेले ७ लाख २० हजार रु.किंमतीचे 24 मोबाईल हस्तगत व मूळ तक्रारदारांना केले परत.

दहिवडी पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी....

आंधळी :
 दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक  अक्षय सोनवणे यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणेकामी दहिवडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अमंलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुशंगाने पथकातील पोलीस स्टाफने सी.ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरविलेले मोबाईलबाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने सदरची मोहीम राबविल्याने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ७,२०,०००/- रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. आज रोजी  उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वडुज अश्विनी शेंडगे यांचे हस्ते मुळ तक्रारदारांना त्यांचे मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहिम पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल,  उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वहुज श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबवण्यात येणार असल्याचे दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वहुज अश्विनी शेंडगे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, 
पो. हवा. बापु खांडेकर, पो.ना. नितीन धुमाळ, पो.कॉ. निलेश कुदळे, पो.कॉ. असिफ नदाफ, पो.कॉ. महेंद्र खाडे. सायबर पोलीस ठाणेचे पो.कॉ. महेश पवार, यांनी केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त