आंतरविभागीय मल्लखांब स्पर्धेत किसन वीर महाविद्यालय प्रथम

वाई :  येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय मल्लखांब पुरूष आणि रोप मल्लखांब महिला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयातील सुमारे ३० स्पर्धक सहभागी झाले होते. 
स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मा. सुजीत शेडगे हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माननीय शेडगे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपले शरीर व मन महत्वाचे असून;विद्यार्थ्यांनी मैदानात दररोज जाऊन शरीर सुदृढ ठेवावे. या कार्यक्रमात जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.मदनदादा भोसले यांनी शुभसंदेश देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. फगरे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठातच्या कार्यक्षेत्रात किसन वीर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वेगळा ठसा उमटवला आहे आणि ते याही स्पर्धेत आपला ठसा उमटवतील याची मला खात्री आहे. किसन वीरच्या खेळाडूंना तसेच  स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनाही मी शुभेच्छा देतो.
या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ नियुक्त डी. पी. भोसले कोरेगावचे कॅप्टन बाळासाहेब भोसले , सिलेक्शन समितीचे चेअरमन आण्णासो पाटील. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर यांनी काम पाहिले.
तसेच पंच म्हणून श्री प्रसाद बेडेकर सचिव, सातारा जिल्हा मल्लखांब संघटना यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी काम पाहिले.
 या स्पर्धेमध्ये किसन वीरच्या मुलींनी रोप मल्लखांब या स्पर्धा प्रकारात  सांघिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला स्पर्धक पुढील होणाऱ्या स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.  वाई जिमखानाचे अध्यक्ष रमेशजी यादव यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक देण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कॅप्टन समीर पवार व त्यांचे सहकारी यांनी कष्ट घेतले .याप्रसंगी  महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त