कुडाळ ता. जावली येथे महिलांशी सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी साधताना संवाद

दीपक पवार कट्टर समर्थक आशिष रासकर यांनी केला छ.सौ वेदांतिका राजे भोसले नेतृत्वाखाली प्रवेश
सातारा- कुडाळ ता. जावली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दीपक पवार गटाने आ. शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला असून हा गट शिवेंद्रराजेंच्या प्रचारात सक्रिय झाला आहे. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासमेवत आशिष रासकर, ग्रामपंचायत सदस्य सुधा रासकर, प्रज्ञा शेवते, सविता बोडरे, भाग्यश्री शेवते, सुरेखा कदम, जयश्री किर्वे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कुडाळमध्ये घर टू घर प्रचार करून आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. 

गावामध्ये प्रत्येक ठिकाणी सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि समर्थक, कार्यकर्ते यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आ. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे कुडाळ जिल्हा परिषद गटाचा कायापालट झाला असून संपूर्ण कुडाळ गट शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा शब्द ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी दिला. संपूर्ण मतदारसंघात आ. शिवेंद्रराजेंनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांनाच विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार कुडाळकरांनी व्यक्त केला. 

आ. शिवेंद्रराजे प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सातारा- जावली मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. मतदारसंघाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले. 



 येत्या काळात कुडाळच्या बदलत्या राजनीतीमुळे मोठ्या घडामोडी होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत यातच कायमस्वरूपी निष्ठावान म्हणून ओळखला जाणाऱ्या आशिष रासकर कुटुंबाच्या बरोबर असणारा शेकडो कार्यकर्ते आता शिवेंद्रराजे यांचे नेतृत्व या मेळाव्यामुळे मान्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहेत त्यामुळे दीपक पवार यांच्याबरोबर वर्षानुवर्ष असणाऱ्या कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे त्यामुळे आशिष रासकर व त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते हे आता भाजप पक्षाचे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या बरोबर गेले का हा प्रश्न पडला आहे दीपक पवारांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे आगामी काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व ग्रामपंचायत च्या निवडणुकीत दीपक पवार गट मोठ्या प्रमाणात यापूर्वी सक्रिय होता आता आशिष रासकर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वेदांतिकाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाला दीपक पवारांची इतर काही या मेळाव्यात सहभागी न झालेले कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत

दीपक पवार यांनी गेल्या काही दिवसापूर्वी दोन्ही उमेदवारांना मतदान न करता आपलं मतदान नोटांना करा असं आवाहन केलं होतं दीपक पवारांच्या या संभ्रम भूमिकेमुळे दीपक पवारांचे कार्यकर्ते नाराज आहेत ?

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला