विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील चोराडे फाटयावर गतिरोधकाचे काम सुरु.

चोराडे ग्रामस्थांच्या मागणीला यश : लोकांमध्ये समाधान.

 खटाव : खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे चौक रस्ता असून एक रस्ता पाटण- पंढरपूर तर दुसरा रस्ता विटा- महाबळेश्वर कडे जाणारा असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत गतिरोधक न बसवल्यास आंदोलन करण्याचा इशारा चोराडे गावचे युवा नेते श्रीकांत पिसाळ यांनी दिल्या बाबतची बातमी सातारा न्यूज ने प्रकाशित केली होती. नंतर संबंधित बांधकाम विभागाने आणि डि.एच.डी. इंन्फ्रा कॉन या कंपनीने तातडीने धामणेर ते विटा या रस्त्यावर सर्वे करून बहुतांश ठिकाणी गतिरोधक बसविल्यामुळे वाहन चालक व ग्रामस्थ यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
         गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग अजिबात कमी होत नाही. विटा महाबळेश्वर रस्त्यावर अनेक वेळा अपघात होताना दिसून येत आहेत.तरी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी मागणी करूनही गतिरोधक बसवण्यात आले नव्हते. गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग कमी राहत नाही, वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे अनेक वेळा समोरासमोर अपघात घडतात. तरी संबंधित बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवून लोकांचे जीव वाचवावेत अशा मागणीचे पत्र संबंधित विभागास दिले होते.परंतू याबाबत सातारा न्यूज ने आवाज उठविला होता.

त्यानंतर संबंधित विभागाने या पत्राची गांभीर्याने दखल घेत चोराडे फाटा सह धामणेर ते विट्यापर्यंत गतिरोधक बसवण्यास सुरुवात केली आहे.यामुळे यापरिसरात होणारे अपघात रोखले जातील. तसेच वाहने कमी वेगाने येतील. गतिरोधकामुळे वाहन धारकांनाही आपल्या वाहनाचा वेग कमी करता येईल. चोराडे ग्रामस्थांच्या मागणीला यश आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

  


 

चोराडे फाटा या चौकामधुन वाहने सुसाट जात होती त्यामुळे अपघात जास्त होत होते. तरी या ठिकाणी संबंधित विभागाकडे गतिरोधक बसवण्यात यावा या ग्रामस्थांच्या मागणीला यश आले. सातारा न्यूज कडून प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत संबंधित विभागा आणि ठेकेदार कंपनीकडून गतिरोधक बसविल्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.

युवा नेते मा.श्रीकांत पिसाळ
चोराडे,

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त