वर्धनगड येथील वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर


वर्धनगड : वर्धनगड येथील वार्डनिहाय आरक्षण सोडत आज वर्धनगड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत करण्यात आली सदर ही सोडत पुसेगाव मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
 आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतच्या येणाऱ्या निवडणुकी संदर्भामध्ये वार्डनिहाय पंचवार्षिक आरक्षण सोडत मंडल अधिकारी ए एम साबळे, मायणी मंडल अधिकारी डीसी दीक्षित, तलाठी अमोल जाधव यांच्या अधिकाराखाली घेण्यात आली वार्डनिहाय सोडत पुढील प्रमाणे वार्ड वार्ड नंबर 1- सर्वसाधारण महिला 2, व ओपन 1 Shot  वार्ड नंबर 2- ना.मा.प्र 1 महिला, सर्वसाधारण 1महिला, ओपन 1 वार्ड नंबर 3- ना.मा.प्र. 1खुला , सर्वसाधारण महिला 1, ओपन 1खुला , शासनाच्या आदेशानुसार चिट्टी द्वारे काढण्यात आला.यावेळी सरपंच अर्जुन मोहिते,ग्रामसेविका सौ ढेंबरे, उपसरपंच शंकर घोरपडे, अर्जुन कुंभार, राजेंद्र वरेकर, विकास शिंदे,मंगेश चव्हाण, नितीन घोरपडे, तुकाराम चव्हाण, आयुब शिकलगार, भरत मोहिते इत्यादी व  ग्रामस्थ उपस्थित होते. या आरक्षण सोडतीनंतर उपस्थितांचे  आभार चांगदेव जाधव यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त