जिल्हा नियोजन समिती निवडीत घटक पक्षांना डावलले

सातारा : जिल्हा नियोजन समिती सदस्यांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांना डावलन्यात आले आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून आगामी निवडणुकीत आम्हाला देखील ग्राह्य धरले जावू नये, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना महायुतीमध्येवादाची ठिणगी पडली आहे.जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीत राष्ट्रवादी,शिवसेना अन् भाजपचा पगडा दिसून आलेला आहे.त्यामध्ये रयत क्रांती संघटना व इतर मित्र पक्षांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे साहजिक रयत क्रांती संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सातारा व माढा लोकसभा मतदार संघात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे वर्चस्व आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा माढा लोकसभा मतदार संघात अल्प मतांनी पराभव झाला होता. हे पाहता खोत यांच्या संघटनेचा जिल्ह्यात दबदबा कायम आहे.मात्र,तरी देखील जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवडीत डावलण्यात आल्याने संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी नाराजी व्यक्त केली असून आगामी निवडणुकीत महायुतीने आम्हाला ग्राह्य धरले जावू नये. आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे अन् आमच्यापुढे अन्य पर्याय खुले आहेत. असा इशारा साबळे यांनी दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला