अफजल खान व सय्‍यद बंडाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्‍त

सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या अफजल खान व सय्यद बंडा यांच्या कबरीच्या अवतीभवती अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे सर्व अनाधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. यानंतर अफजलखान व सय्यद बंडाच्या कबरीवरील सर्व बांधकाम व भिंतीही नष्ट करण्यात आल्‍या. आता पुरातन काळात जशी अफजल खान आणि सय्यद बंडाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर बनवली गेली होती, त्याच पद्धतीची कबर दिसत आहे. त्‍यामुळे सध्या हा परिसर अतिक्रमणमुक्‍त दिसत आहे.

अफजलखान सय्यद बंडाच्या कबरीचे उदातीकरण झाल्यानंतर या ठिकाणी या कबरीला दर्ग्याचे स्वरूप देण्यात आले होते. या कबरीच्या अवतीभवती मोठ मोठाले धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात केले जात होते. मात्र स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा शत्रू अफजलखान व सय्यद बंडा याच्या कबरीचे उदात्‍तीकरण करून त्याला धार्मिक स्वरूप देण्याच्या प्रयत्नावर न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.

हिंदू एकता समितीने व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हे उदातीकरण रोखावे अशी मागणी देखील केली होती. गेल्‍या वीस वर्षानंतर सर्व कबरीच्या अवतीभोवतीचे व कबरीवरील सर्व उदात्‍तीकरणासाठी बांधले गेलेले बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले. यानंतर उघडी छताड पडलेली अफजलखान व सय्यद बंडाची ही कबर खुल्या आसमानात दिसत आहेत. प्रशासनाने या कबरीच्या अवतीभवती हिरवे कापड संरक्षक भिंत म्हणून लपेटले आहे

 

 

 

 

 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला