शिवरायांच्या 'या' ११ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन
Satara News Team
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
- बातमी शेयर करा
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे वैभव आहेत. ४०० वर्षानंतरही आजही सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपत भक्कम उभे आहेत. दरवर्षी लाखो शिवप्रेमी या किल्ल्यांवर जात असतात. त्यात आता छत्रपती शिवरायांच्या ११ किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत नामांकन मिळाले आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली की, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट २०२४-२५ मध्ये नामांकन मिळाले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शिववारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे असं त्यांनी सांगितले.

शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप!
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत.…
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th Jan 2024 03:30 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th Jan 2024 03:30 pm













