सातारा जिल्ह्यात आजची दिवसभरातील क्राईम डायरीत

साताऱ्यात नटराज मंदिराबाहेर भरदिवसा डोक्यात गोळी घालून अज्ञाताने केला खून..

 साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीक असलेल्या नटराज मंदिराबाहेर फायरिंग झाले असून यामध्ये एकाचा अज्ञाताने डोक्यात बांदुकीची गोळी झाडून खून केला आहे.. आज दुपारी भर पावसात ही घटना घडली असल्याने शहरात खळबळ उडाली असून परिसरात घबराहट निर्माण झालीये.. घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय. भर दुपारी शहराच्या परिसरात घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.. वाई येथील रहिवासी असलेला अर्जुन यादव याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले असून मारेकऱ्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश येईल असे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

रहिमतपूर : किरोली ता.कोरेगाव गावच्या हद्दीत उरमोडीच्या डाव्या कालव्यामध्ये गणेश हणमंत काळंगे हा युवक मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती उदयराज काळंगे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस नाईक एस. बी. निकम करत आहेत.


विनयभंग, मारहाणप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल 

सातारा : आसनगाव ता.सातारा येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून विनयभंग करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबतची अधिक माहिती अशी कि, मनीषा गोपीचंद मोरे (वय ३७, रा. आसनगाव) या घराबाहेर आल्या असता मारुती बाळू मोरे याने विनयभंग करत साडी ओढून ब्लाउज फाडला तर बाळू उर्फ मोक्या मोरे, बाळकृष्ण यशवंत मोरे, अंजली मारुती मोरे, मीरा बाळकृष्ण मोरे यांनी लाथांनी व हाताने मारहाण केली असल्याची फिर्याद मनीषा मोरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिल्यावरून वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत. 

गळफास घेऊन आत्महत्या 

पुसेगाव : पुसेगाव गावच्या हद्दीतील करणजाई नावाच्या शिवारात झाडाच्या फांदीला दारूच्या नशेत गळफास घेऊन राहुल जयवंत कदम (वय ३४, रा.कटगुण ता.खटाव) याने आत्महत्या केली. 
यांची खबर मयताचे बंधू नवनाथ जयवंत कदम यांनी पुसेगाव पोलीस पाण्यात दिली असून अधिक तपास पो ना भोसले करत आहेत . 

दुचाकीची चोरी 

सातारा : सातारा उपनगरातील नटराज मंदिराच्या पाठीमागील बाजूस राहत्या घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी क्र. एमएच ११ सीएक्स ०२६१ हि अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरून नेली. 
याप्रकरणी धनंजय चंद्रकांत बनसोडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करत आहेत. 

बंद घर फोडून सवादोन लाखांची चोरी

सातारा - येथील सदरबझारमधील बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी काल दुपारी सवादोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. नीलेश जालिंदर घाडगे (रा. कांगा कॉलनी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदरबझारमधील कांगा कॉलनीत त्यांचे घर आहे. काल दुपारी साडेबारा ते सव्‍वादोन या कालावधीत ते बाहेर गेले होते. या वेळी चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश करून आतील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवरचा दरवाजा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी या कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. उपनिरीक्षक सुधीर मोरे तपास करत आहेत.

दुचाकीला गाडी आडवी मारून एकास मारहाण 

फलटण : मोटारसायकलला गाडी आडवी मारत 'तू मोबाईलवरून जास्त पोस्ट करतोस, तुझ्या पोस्ट आम्ही वाचतो, तुला जास्त मस्ती आली आहे का? असे म्हणत गाडीतील टॉमी घेऊन अंगावर धावत येऊन मारहाण केल्याप्रकरणी माऊली बनकर (रा.राजाळे ता.फलटण जि.सातारा) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हरीश हणमंत काकडे यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करत आहेत. 

कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात तोडफोड 

कोरेगाव : कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दहशत माजवत ओपीडी, फार्मसी व रुग्णालयाच्या इमारतीच्या काचा फोडल्या प्रकरणी आकाश रजपुत, रोहित रजपुत (दोन्ही रा. दत्तनगर कोरेगाव), राहुल चव्हाण (गोसावी वस्ती, कोरेगाव) व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोडफोडीत रुग्णालयाचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस नाईक आवटे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला