साताऱ्यातील अनुभव पुढील वाटचालीत दिशादर्शक ठरेल : अजयकुमार बन्सल

सातारा :  गडचिरोलीसारख्या ठिकाणी काम करून आल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा असलेल्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्ह्याचे राजकीय तसेच ऐतिहासिक महत्व फार मोठे असल्याने तसेच क्रांतीकारी जिल्हा असल्याने इथे काम करण्याचे मोठे आव्हान समोर होते. मात्र, या जिल्ह्याची माती अन्‌ माणसं खूप प्रेमळ तसेच कामाची कदर करणारे असल्याने काम करताना खूप आनंद मिळाला.

इथली माणसं, निसर्गासह प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवणारी असून वैयक्तीक मला सातारा जिल्ह्याने खूप काही शिकवल्याचे मावळते पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. पोलीस करमणूक केंद्रात शनिवारी त्यांना निरोप देण्यात आला. नवे पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे स्वागत करण्यात आले. तेव्हा बन्सल बोलत होते. यावेळी एसपी समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. बन्सल म्हणाले, “सातारा जिल्हा क्रांती घडवणारा जिल्हा असून इतिहासात या जिल्ह्याचे मोठे स्थान असल्याने इथे काम करताना वेगळा अनुभव मिळतो. जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, माध्यमं तसेच विविध संघटनांसह पोलीस दलातील अमंलदारापासून ते अप्पर पोलीस अधीक्षकांपर्यंत सगळ्यांनी मोलाचे सहकार्य केले. म्हणूनच चांगले काम करता आले व जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांसाठी पोलीस दलाला सदैव तत्पर ठेवता आले.

या जिल्ह्यात एसपी म्हणून जितकं शिकायला मिळाले त्याहून अधिक माणूस म्हणून शिकायला मिळाले.” भविष्यातील वाटचालीत साताऱ्यात मिळालेले अनुभव नक्कीच दिशादर्शक ठरतील, असा विश्‍वास बन्सल यांनी व्यक्त केला. नवनियुक्त एसपी समीर शेख म्हणाले, “सातारा जिल्ह्यात मी यापूर्वी काम केले असून इथे काम करताना नवी प्रेरणा मिळते. अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले असून त्यांनी पोलीस दलाचा जनमानसात वाढवलेला विश्‍वास कायम ठेवण्याचे काम माझ्याकडून केले जाईल

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त