३७ व्या राष्ट्रीय खेळाच्या गोवा येथे होणाऱ्या सेपक टकरा या स्पर्धेसाठी महिला संघाच्या कर्णधार पदी अपेक्षा अनिल दडस हिची निवड
धिरेनकुमार भोसले
- Sat 28th Oct 2023 11:03 am
- बातमी शेयर करा
दहिवडी : ३७ व्या राष्ट्रीय खेळाच्या गोवा येथे होणाऱ्या सेपक टकरा या स्पर्धेसाठी महिला संघाच्या कर्णधार पदी अपेक्षा अनिल दडस हिची निवड करण्यात आली.ही स्पर्धा ३० ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर पर्यंत होणार आहेत.राष्ट्रीय खेळासाठीचे सराव शिबिर नागपूर येथे नुकताच दिनांक ०३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाले.यामधूनच महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली.
दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले असते.अनेक जण या स्पर्धेत संधी मिळावी म्हणून प्रयत्न करीत असतात.गोवा येथे विविध स्पर्धेचे राष्ट्रीय स्तरावर नियोजन करण्यात आलेले आहे.त्यामध्ये सेपक टकरा या महिला संघाचे नेतृत्व पांगरी गावची कन्या अपेक्षा अनिल दडस ही करणार असून या संघामध्ये नाशिकची मधुरा टेपाळे आणि नागपूरची चेतना रोंगला यांची देखील निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुका दुष्काळग्रस्तांचा तालुका म्हणून सर्वश्रुत आहे.आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांचे मुळ गाव याचं तालुक्यातील मोही.त्यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले नाव जगाच्या नकाशावर कोरले.
याच माणमध्ये पाण्याचा दुष्काळ असला तरी,बुध्दी,खेळाडू व अधिकाऱ्यांचा सुकाळ असल्याचे पहावयास मिळते.जिल्ह्यात सर्वाधिक अधिकारी याच माणमध्ये आहेत.या तालुक्यातीलच ग्रामीण भागातील पांगरी गावची सुकन्या अपेक्षा दडस देखील महाराष्ट्राची कर्णधार म्हणून गोवा येथे राष्ट्रीय खेळासाठी जाणार आहे.
या निवडीबद्दल अपेक्षाचे आ.जयकुमार गोरे,प्रभाकर देशमुख,अनिल देसाई,प्राचार्य सुरेश साळुंखे,चंद्रकांत भोईटे,अर्जुन काळे यांनी अभिनंदन करून गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अपेक्षाचे सेपक टकरावर प्रभुत्व
अपक्षा दडसला लहानपणापासून खेळाची आवड असल्याने तीने मार्गदर्शकांकडून सराव करून बॅंकॅाक,राजस्थान,मनीपूर,बिहार,हैद्राबाद,दिल्ली,नागपूरसह विवीध ठिकाणी खेळाडूंसह यश संपादन केले आहे.पंजाब येथे शालेय खेळांसाठी महाराष्ट्र महिला खेळाडूंची प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
#AsianGames
#Sepaktakraw
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 28th Oct 2023 11:03 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 28th Oct 2023 11:03 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sat 28th Oct 2023 11:03 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 28th Oct 2023 11:03 am
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sat 28th Oct 2023 11:03 am
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 28th Oct 2023 11:03 am
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sat 28th Oct 2023 11:03 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sat 28th Oct 2023 11:03 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sat 28th Oct 2023 11:03 am
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sat 28th Oct 2023 11:03 am













