नागठाणे कॉलेजचे विविध स्पर्धा प्रकारात घवघवीत यश

देशमुखनगर : नागठाणे येथील आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये  पार पडलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विभागीय स्पर्धेमध्ये नागठाणेच्या आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजने वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि सुगम गायन स्पर्धा या विविध स्पर्धा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयीन गटात वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.श्रेया देशमुख हिने 'युध्द नको, बुध्द हवा' या विषयावर सर्वोत्कृष्ट सादरीकरण करुन प्रथम क्रमांक पटकावला.तसेच कु.आदित्य विजय घोरपडे हिला  
स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार' या विषयावरील निबंधास  तृतीय क्रमांकाचे तर कु.वेदांतिका कांबळे हिला सुगम गायन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गुरुदेव कार्यकर्ते गटामध्ये प्रा.डाॅ.राजाराम कांबळे
 यांना 'शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे मूल्यविचार'' या निबंधास स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर प्रा.आचल तावरे यांना चित्रकला स्पर्धेत या 'पर्यावरण जनजागृती' विषयावरील तृतीय क्रमांक मिळाला.याप्रसंगी सर्व यशस्वी स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.(डॉ) सतीश घाटगे  तसेच 
मार्गदर्शक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष निलाखे व त्यांचे सर्व सदस्य  सहकारी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला