नागठाणे परिसरात चोर मचाये शोर..
बोरगाव पोलीस चोरांना पकडायला ना कामयाब ; यात्रा जत्रा मुळे चोरीच्या घटनात वाढ.Satara News Team
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
- बातमी शेयर करा
नागठाणे : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसात परिसरात काही मोठ्या तर काही छोट्या चोऱ्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत.यात्रा जत्राच्या कालावधीत या चोरीच्या गुन्ह्याची वाढ होत आहे.बोरगाव पोलिसात काही मोठ्या चोऱ्यांची नोंद आहे तर छोट्या चोऱ्या दाखल करून मिळणार काय असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.तर तक्रारदार नोंद करण्यास गेले तर आधी तपास मग तक्रार असा नवा फंडा पोलीस आणत आहेत.याची चर्चा परिसरात होत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः पाली यात्रेनंतर बोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .छोट्या मोठ्या चोऱ्या घडतच आहेत काही गावांमध्ये घरफोडीचे प्रयत्नही झाले. परंतु, गावोगावी काही युवकांच्या मुळे चोऱ्यांचे प्रयत्न निष्फळ झाल्याचेही दिसत आहे.
नागठाणे परिसर हा सातारा तालुक्यातील बागायत भाग म्हणून ओळखला जातो.नागठाणे येथे मुख्य बाजार पेठ आहे.येथील आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो येथे जिल्हयातील मोठे व्यापारी येत असतात.तसेच शैक्षणिक संकुल ,पुणे बंगलोर महामार्गावरील मोठ गाव म्हणून या गावची ख्याती आहे.या परिसरात सातारा,पाटण तालुक्यातील लोकांचा राबता नेहमी होत असतो.गेल्या कित्येक दिवसंपासून या परिसरात चोऱ्यांच्या घटणात वाढ झाली आहे.मोठ मोठ्या चोऱ्या काही छोट्या चोऱ्या नेहमीच घडत असतात. विशेषतः पाल (ता.कराड) येथील झालेल्या यात्रेनंतर या घटनात वाढ दिसून येत आहे.काही चोऱ्या या पोलीस दफ्तरी नोंद आहेत तर काही चोऱ्यांची पोलीस दखल घेत नाहीत असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे तर काही तक्रारदार तक्रार घेऊन गेल्यास आहे तपास करतो मग तक्रार दाखल करा अशी समजूत काढली जाते.
मोबाईल चोरी नित्याचीच बाब.
नागठाणे गाव म्हणजे या परिसरातील मोठी बाजारपेठ येथे दररोज मोठ्या स्वरूपात आर्थिक उलाढाल होत असते.येथील आठवडा बाजार मंगळवार या दिवशी असतो.या दिवशी या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.यावेळी सातारा,पाटण तालुक्यातील बरचे लोक येत असतात.या दिवशी मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या चोऱ्या घडत असतात.काही किमती मोबाईल चोरीला गेले तर तक्रारदार बोरगाव पोलीस ठाण्यास तक्रार नोंद करण्यास गेले की मिसिंग दाखल करून घेतली जाते.तर तक्रारदार उगाच नको तो ताप म्हणून तक्रार देण्यास टाळतात.
गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या बऱ्याच जणांच्या नदीवरील मोटरच्या केबल चोरीची तक्रार दाखल करण्यास गेलो होतो पण तपास करू मग तक्रार दाखल करू असे सांगण्यात आले.अद्याप तपास झालाच नाही मग आम्ही तक्रार कधी दाखल करू.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 10th Feb 2024 03:41 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 10th Feb 2024 03:41 pm













