बनपुरी तालुका पाटण येथील विहिरीच्या फुगवाट्यात शेती बुडण्याचा धोका तसे घडल्यास बनपुरी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा
सागर पाटील
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
- बातमी शेयर करा
पाटण: बनपुरी ता.पाटण येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेची विहिर वांग नदीच्या ब्लु व रेड झोनमध्ये पुरेषेच्या आत येत असल्याने ते अनधिकृत असल्याचा निष्कर्ष कोयना सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढला असून स्थानिक शेतकऱ्यांनी विहिरीमुळे निर्माण होणाऱ्या फुगवट्यात आमची शेती बुडण्याच्या धोक्याची व तसे घडल्यास आत्मदहनाचा तक्रार वजा इशारा संबधित विभागास दिला आहे.
याबाबत संबधित तक्रारदार शेतकऱ्यांनी कोयना सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे लेखी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलेआहे कीग्रामपंचायत बनपुरी यांनी सातारा लोकसभेचे खास. व माजी पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बनपुरी गावासाठी 1 कोटी 97 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. नंतर ग्रामपंचायतीने कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने विहिर कामकेले आहे काम सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी घेतलेली नाही.
आम्ही कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांना 9 जून रोजी आमचा तक्रारी अर्ज दाखल दिल्यानंतर सिंचन विभागाचे श्रेणी दोनचे अभियंता राहुल बामणे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अविनाश व्यवाहारे हे 16 जून रोजी या विहिरीची पाहणी करण्यासाठी आले असता विहिरीचे बांधकाम पूर्णपणे वांग नदीपात्रामध्ये येत असून शासन परिपत्रकानुसार क्र.पु.र.नी 2018 (182)/2018 सिंचन व महसूल विभागाच्या अंतर्गत निर्णयानुसार ते वांग नदीच्या लाल व निळ्या पुर रेषेमध्ये येत आहे त्यामुळे हे बांधकाम पूर्ण अनधिकृत आहे असा निष्कर्ष काढला आहे.
सदर विहीर 80 % नदीपात्रात मध्ये आहे त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी विहिरीला धडकून पाठीमागे फुगी निर्माण होऊन ते पाणी गट नंबर 25, 26, व 32 हे गट नंबरच्या शेतीत घुसून ही शेती पूर्णपणे बाधित होणार आहे त्यामुळे आमची पिके नष्ट होण्याचा निर्माण झाला आहे.
नदिपात्र आणि परिसराचा अंदाज घेऊन विहिरीची जागा निवडणे क्रमप्राप्त होते तसे न केल्यामुळे आमच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण ?असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित करूनआम्हाला न्याय मिळावा अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
या अर्जावर संदीप श्रीरंग पवार, सुरेश भगवान पाटील, सुरेश बाबुराव पवार, तुकाराम श्रीपती पवार यांच्या सह 15 शेतकऱ्यांच्या सह्या असून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करणार आहे असा इशारा निवेदनात त्यांनी कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांना दिला आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 27th Jun 2023 03:11 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 27th Jun 2023 03:11 pm













