दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी जाहीर;जाधव,पवार यांना संधी

दहिवडी/ दहिवडी नगरपंचायतीच्या विषय समित्यांवर नामनिर्देशन झालेल्या सदस्यांमधून विषय समिती सभापती निवडी नगरपंचायत सभागृहात करण्यात आल्या.सदर प्राप्त अर्जांची छाननी केली असता बांधकाम समितीसाठी सौ.उज्वला अमर पवार,स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीसाठी महेश पतंगराव जाधव,महिला व बालकल्याण समितीसाठी सौ.सुप्रिया महेंद्र जाधव यांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी घोषित केले.


 महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी कोणताही अर्ज न आल्याने सदर पद रिक्त राहिल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात आले.बांधकाम सभापती उज्वला पवार यांच्या पदासाठी नगरसेविका राणी अवघडे यांनी सूचक तर सुरेखा पखाले यांनी अनुमोदन केले.स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती महेश जाधव यांच्या पदासाठी नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनी सूचक तर रुपेश मोरे यांनी अनुमोदन केले.

महिला व बालकल्याण सभापती सुप्रिया जाधव यांच्या पदासाठी मोनिका गुंडगे यांनी सूचक तर विजया जाधव यांनी अनुमोदन केले.निवडी जाहिर होताच मंत्री जयकुमार गोरे,शेखर गोरे,प्रभाकर देशमुख,नगराध्यक्ष सागर पोळ,उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे,विरोधी पक्ष नेते धनाजी जाधव,सुरेखा पखाले,विशाल पोळ,वर्षाराणी सावंत,निलीमा जाधव,बाळासाहेब सावंत,अतुल जाधव यांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त