कराड उत्तरचा पुढील आमदार भाजपचाच असेल आ. जयकुमार गोरे
Satara News Team
- Mon 29th Jul 2024 11:24 am
- बातमी शेयर करा

पुसेसावळी : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पाणीप्रश्नासह सर्व महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासाठी धैर्यशील कदम प्रयत्नशील असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे.
विकासकामे व पाणीप्रश्नाची अजिबात काळजी करू नये. आगामी विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरचा आमदार भाजपचाच असेल. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
वर्धन अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पुसेसावळी, ता. खटाव येथे झालेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता कदम,
गीतांजली कदम, तेजस्विनी कदम, राजवर्धन कदम, संपतराव माने, सुरेश पाटील, महेश जाधव, सत्वशील कदम, शंकर शेजवळ, महेश पाटील, महेश घार्गे, श्रीकांत पिसाळ, दत्तात्रय थोरात, धनाजी माने, तुषार माने, अमोल कदम, ज्ञानेश्वर पवार, दिलीप यादव, अमित जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमशील कदम यांचे सामाजिक, राजकीय व औद्योगिक श्रेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. कदम कुटुंबीयांनी समाजसेवेचा वसा अखंड ठेवावा. शामगाव, हणबरवाडी पाणी योजना व अन्य विकासकामांची फाइल अंतिम टप्प्यात असून, त्यास लवकरच मंजुरी मिळेल.
धैर्यशील कदम म्हणाले, विक्रमशील कदम यांचा वाढदिवस, हे निमित्त असून, त्यामुळे सर्वांना भेटता येते. पुढील वर्षाचा संकल्प करता येतो. मतदारसंघात पंधरा हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून, रामराज्य रथाच्या माध्यमातून गावोगावी लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत लवकरच वीस हजार लोकांना एकाच वेळी लाभ देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
विक्रमशील कदम म्हणाले, आ. गोरे व धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, अखंडपणे कार्यरत राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी पाठीशी राहावे. जितेंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संजय घोरपडे यांनी आभार मानले.
#jaykumargore
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Mon 29th Jul 2024 11:24 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Mon 29th Jul 2024 11:24 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Mon 29th Jul 2024 11:24 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Mon 29th Jul 2024 11:24 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 29th Jul 2024 11:24 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Mon 29th Jul 2024 11:24 am
संबंधित बातम्या
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Mon 29th Jul 2024 11:24 am
-
दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी जाहीर;जाधव,पवार यांना संधी
- Mon 29th Jul 2024 11:24 am